Details
नसीम खान यांच्या प्रयत्नांतून चांदिवली अग्निशमन बीट केंद्राची सुरुवात!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मागच्या काही वर्षांपासून मुंबईत पवई, संघर्ष नगर, म्हाडा, हिरानंदानी, साकीनाका इत्यादी ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा पोहोचण्याआधीच गंभीर घटना घडत होत्या. आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी पाठपुरावा करत लेकहोम इमारतीसमोर महापालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेवर बीट फायर स्टेशन (मिनी फायर स्टेशन) मंजूर करून विकसित करून घेतले. त्याचे लोकार्पण त्यांनी नुकतेच केले. याप्रसंगी अग्निशमन दलाचे मरोळ अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी एच. आर. शेट्टी, उप अग्निशमन अधिकारी माटले, अग्निशमन दलाचे जवान तसेच लेकहोमचे मजहर ठाकूर, मिलिंद मोंडकर आदी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो