Details
देवेंद्र भुजबळ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वतःच्या कामाची समाजासमोर प्रभावी ओळख निर्माण केल्याबद्दल आणि विविध क्षेत्रातील प्रसंशनीय जनसेवेबद्दल राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना नुकतेच प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात सम्मेलनाचे अध्यक्ष जगदगुरू महास्वामी डॉ. रंगनाथ नाथराव जोशी, सिद्धीमहायोगपीठाधिश्वर, महाशक्तीपीठ, तुळजापूर, इतिहास संशोधक,साहित्यिक भा. ल. ठानगे, सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक डॉ. नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जगदगुरू महास्वामी श्री. श्री. डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांनी आपल्या रसाळ वाणीने विश्वशांतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच माणसामाणसातील परस्पर संबंध दृढ होण्याची गरज समजावून सांगितली. यावेळी विचारवंत अजय महाजन, भारताच्या संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी महेश अयंगार, गप्पागोष्टीकार जयंत ओक, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूपाल रावळ, चित्रकार प्रतिभा रावळ, सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या भरगच्च सम्मेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन, कवी सम्मेलन, व्याख्यानेही झाली.”
“केएचएल न्यूज ब्युरो