HomeArchiveदेवनार पशुवधगृह येत्या...

देवनार पशुवधगृह येत्या बकरा ईदसाठी सज्ज!

Details
देवनार पशुवधगृह येत्या बकरा ईदसाठी सज्ज!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाजी अरफात शेख यांनी घेतला आढावा
आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असलेले मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह येत्या 12 तारखेच्या बकरा ईदसाठी सज्ज झाले आहे. साधारण 2 लाख शेळ्या-मेंढ्या येथे येण्याचा अंदाज असल्याने महापालिकेने सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. शनिवारी संध्याकाळी या पशुवध केंद्राची राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तसेच राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मनपा आणि पोलिस अधिकार्यां समवेत या ठिकाणची पाहणी केली. या केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश शेट्टी, या विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भुजबळ, झुल्फीकार कुरेशी, हाजी रहमान, सोहेल शेख आणि अफझल शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सुचनांचे पालक करण्यात आले असून तेथे सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यात आल्याचे हाजी अरफात शेख यांनी सांगितले. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे आभार मानतो असेही ते यावेळी म्हणाले.
 
आतापर्यंत 81 हजार 308 शेळ्या-मेंढ्या तर 15 शेच्या वर मोठ्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. या परिसरात सर्व सुरक्षायंत्रणा चोख राहवी म्हणून 11 फूट उंचीचे 15 टॉवर्स व 22 फूट उंचीचा चेक टॉवर, 16 इतर टॉवर्स उभारण्यात आले आहेत. परिसरावर लक्ष ठेवता यावे म्हणून 208 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या 300 करण्यात आली आहे. जनावरांची चोरी होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. प्रवेशपत्रांचे बारकोडींग, स्मार्ट कार्ड अशा डिजीटल यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे.
 
बाहेरून आलेल्या विक्रेत्यांना व्यापार्यांेना योग्य त्या सोईसुविधा पुरवण्याचे काम महापालिका यंत्रणेने केले असून सुरक्षेची काळजी पोलीसयंत्रणेने घेतली आहे. यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content