HomeArchiveत्वरित पर्यायी व्यवस्था...

त्वरित पर्यायी व्यवस्था करा – राहुल शेवाळे

Details
त्वरित पर्यायी व्यवस्था करा – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने बंद केलेल्या पादचारी पुलांमुळे मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. पूल बंद करण्याचा निर्णय हा सुरक्षेच्या कारणास्तव घेतला असला तरीही नागरिकांना त्वरित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना खासदार राहुल शेवाळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना केली आहे.

गुरूवारी खासदार शेवाळे यांनी संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, दक्षिण-मध्य मुंबईतील बंद केलेल्या पादचारी पुलांची पाहणी करताना अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.

सीएसटी स्थानकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील अनेक पूल बंद करण्यात आले. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वडाळा रेल्वेस्थानक पादचारी पूल, किंग्स सर्कल स्थानकाजवळील पादचारी पूल, दादर फुल मार्केटजवळील पूल यांची पाहणी केली.

वडाळा पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील सुमारे 150 मीटरचे दोन पादचारी पूल धोकादायक ठरवून गेल्या 4 महिन्यांपासून रेल्वे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने बंद केले आहेत. यामुळे वडाळा पूर्वेच्या संगम नगर, कोरबा मिठागर, बीपीटी वसाहत येथून वडाळा स्थानकात येणाऱ्या सुमारे 5 लाख नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यातील एका पादचारी पुलाचे संरचनात्मक परीक्षण त्वरित करून तो खुला करण्याची मागणी शेवाळे यांनी केली.

किंग्स सर्कल रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पादचारी पूल बंद असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी नजीकच्या माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा रेलिंग्स लावावेत, अशा सूचना खासदार शेवाळे यांनी केल्या. दादर रेल्वेस्थानकावरील फुल मार्केट पुलावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता या पुलाचे रूंदीकरण करावे तसेच गर्दीच्या वेळी येथे गर्दीचे नियमन करण्यासाठी रेल्वे पोलीस तैनात ठेवावेत, अशी मागणीही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

गुरूवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात खासदार राहुल शेवाळेंसह विभागप्रमुख मंगेश सातमकर, नगरसेविका राजश्री शिरवाडकर, नेहल शहा, उर्मिला पांचाळ, मध्य रेल्वेचे सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर गर्ग, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कार्यकारी अभियंता गरडे, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक भरडे, मुख्य अभियंता दराडे, सहाय्यक आयुक्त दिघावकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content