HomeArchiveडॉ. लव्हेकर यांच्या...

डॉ. लव्हेकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

Details
डॉ. लव्हेकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

    09-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांच्या वर्सोवा, आरटीओजवळील चित्रकूट ग्राउंड येथील मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.
 
 
शिवसंग्राम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय पांडे, मुंबई भाजपा सचिव दिव्या ढोले, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, शहिद भगतसिंह यांचे पणतू विक्रम सिंह संधू, नगरसेवक योगिराज दाभाडकर, नगरसेवक रोहन राठोड, नगरसेविका रंजना पाटील आदी मान्यवर तसेच येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 

यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्याचा गौरव करून मागील ५ वर्षांत त्यांनी विधानसभेत महिलांचे जास्तीतजास्त प्रश्न मांडले तर वर्सोवा विधानसभेतील अनेक प्रश्नांना वाचा फोडून ते सोडवले, असे सांगितले. यावेळी महायुतीशी गद्दारी करणाऱ्या शिवसेनेच्या महिला विभागसंघटक व नगरसेविका राजुल पटेल यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवसेनेने त्यांना नगरसेवकपद आणि अनेक समित्या दिल्या. मात्र त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे त्यांना येथील मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा येथून लव्हेकर विजयी होतील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. 
 
 

 
 
 
यावेळी विनायक मेटे आपल्या भाषणात म्हणाले की, आज विजयादशमी असून येथून पुन्हा एकदा विजयी पताका फडकवत लव्हेकर विजयी होतील. जगात देशाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे केले आहे तर गेल्या ५ वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस यांना विजयी करताना लव्हेकर यांना पुन्हा विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी येत्या १२ दिवसांत अहोरात्र मेहनत करण्याचे आवाहनही मेटे यांनी केले.
 
 
यावेळी बंडखोर उमेदवार राजुल पटेल यांच्यावर कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित केले जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितले आहे, अशी माहिती मेटे यांनी दिली. रघुनाथ कुलकर्णी म्हणाले की,””हमारा बूथ सबसे मजबूत””या उक्ती प्रमाणे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ध्येय, सक्रियता व आत्मविश्वास या जोरावर लव्हेकर यांना पुन्हा एकदा येथून विजयी केले पाहिजे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांच्या वर्सोवा, आरटीओजवळील चित्रकूट ग्राउंड येथील मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.”
 
 
“शिवसंग्राम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय पांडे, मुंबई भाजपा सचिव दिव्या ढोले, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, शहिद भगतसिंह यांचे पणतू विक्रम सिंह संधू, नगरसेवक योगिराज दाभाडकर, नगरसेवक रोहन राठोड, नगरसेविका रंजना पाटील आदी मान्यवर तसेच येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.”
 

“यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्याचा गौरव करून मागील ५ वर्षांत त्यांनी विधानसभेत महिलांचे जास्तीतजास्त प्रश्न मांडले तर वर्सोवा विधानसभेतील अनेक प्रश्नांना वाचा फोडून ते सोडवले, असे सांगितले. यावेळी महायुतीशी गद्दारी करणाऱ्या शिवसेनेच्या महिला विभागसंघटक व नगरसेविका राजुल पटेल यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवसेनेने त्यांना नगरसेवकपद आणि अनेक समित्या दिल्या. मात्र त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे त्यांना येथील मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा येथून लव्हेकर विजयी होतील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. ”
 
 

 
 
 
“यावेळी विनायक मेटे आपल्या भाषणात म्हणाले की, आज विजयादशमी असून येथून पुन्हा एकदा विजयी पताका फडकवत लव्हेकर विजयी होतील. जगात देशाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे केले आहे तर गेल्या ५ वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस यांना विजयी करताना लव्हेकर यांना पुन्हा विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी येत्या १२ दिवसांत अहोरात्र मेहनत करण्याचे आवाहनही मेटे यांनी केले.”
 
 
“यावेळी बंडखोर उमेदवार राजुल पटेल यांच्यावर कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित केले जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितले आहे, अशी माहिती मेटे यांनी दिली. रघुनाथ कुलकर्णी म्हणाले की,””हमारा बूथ सबसे मजबूत””या उक्ती प्रमाणे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ध्येय, सक्रियता व आत्मविश्वास या जोरावर लव्हेकर यांना पुन्हा एकदा येथून विजयी केले पाहिजे.”

मुंबईवर्सोवा विधानसभा मतदारसंघमहायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकरकार्यालयाचे उद्घाटनभाजपामंगल प्रभात लोढाविजयादशमीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content