Details
डॉ. पु. भ. लोहिया यांना जीवनगौरव पुरस्कार
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पर्यायी चिकित्सा पद्धतीच्या राष्ट्रीय परिषदेत इंडियन अकॅडमी ऑफ अॅक्युपंक्चर सायन्सचे अध्यक्ष व जागतिक किर्तीचे अॅक्युपंक्चर तज्ञ डॉ पु. भ. लोहिया यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इंडियन फोरम ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन आणि सिक्स सेंस असोसिएशनच्या वतीने मुंबई येथील लाला लाजपतराय कॉलेज सभागृहात झालेल्या या परिषदेत देशभरातून सुमारे 300 चिकित्सक उपस्थित होते. कुठलीही एक उपचारपद्धती परिपूर्ण नसून प्रत्येक उपचारपद्धतीला मर्यादा आहेत. त्यामुळे एखाद्या उपचारपद्धतीबद्दल अहंगंड बाळगण्याऐवजी रूग्णासाठी जी पद्धत उपयुक्त असेल तिचा वापर करावा (क्यूरोपथी) आणि रूग्णांशी सहानुभूतीने वागावे (सिम्पथी) असे आवाहन डॉ. लोहिया यांनी परिषदेच्या उदघाट्नप्रसंगी केलेल्या भाषणात संगितले.
या परिषदेत डॉ. बी. कुमार (हिप्नोथेरेपी), डॉ. धारा भट (पिर्यामीड), डॉ. लोहिया (अॅक्यूपंक्चर), डॉ. हेमंत ठक्कर (सुजोक) डॉ. नगर्सेकर, डॉ. अशोक सचदेव अशा 12 वक्त्यांनी विविध उपचारपद्धतींविषयी माहिती दिली. गीता ठक्कर यानी परिषदेचे संयोजन केले. अध्यक्षस्थानी विजय जैन होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो