HomeArchiveज्येष्ठ क्रीडा पत्रकार...

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, विनायक राणे यांना पुरस्कार

Details
“ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, विनायक राणे यांना पुरस्कार”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या 35 वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेत पाच हजारांपेक्षा अधिक लेख लिहिणाऱ्या, अनेक उदयोन्मुख पत्रकारांसाठी द्रोणाचार्य असलेले दै.`नवाकाळ’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांची महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी `महाराष्ट्र टाइम्स’चे क्रीडा पत्रकार विनायक राणे यांची निवड करण्यात आल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जाहीर केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपल्या द्वितीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. लवकरच या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. 1985 सालापासून क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात सुहास जोशी यांनी फार मोठे योगदान दिले आहे. `सांज तरूण भारत’पासून सुरू झालेली त्यांची क्रीडा पत्रकारिता आजही त्याच उत्साहात सुरू आहे. गेल्या 35 वर्षांत त्यांची `सांज तरूण भारत, मुंबई तरूण भारत आणि दै. नवाकाळ या दैनिकांत क्रीडा पत्रकारिता बहरली. या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतभ्रमंती केली. 2005 साली त्यांनी संस्मरणीय असा युरोप अभ्यास दौराही केला.

अनेक ज्युनियर पत्रकारांसाठी जोशी नेहमीच मार्गदर्शक आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या लेखांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना, संघटकांना न्याय मिळवून दिलाय. अनेकांना मदत आणि रोजगार मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या आजवर दैनिकांसह अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके,त्रैमासिके आणि दिवाळी अंकांमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी बऱ्याच क्रीडात्मक कार्यक्रमांचे सादरीकरणही केले आहे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचा गौरव युआरएल, राज्य कबड्डी, श्री समर्थ व्यायाम मंदिर, राज्य कॅरम, उपनगर कबड्डी, विचारे प्रतिष्ठान या नामांकित संस्था-संघटनांनी क्रीडा पत्रकारिता पुरस्कार देऊन केला आहे.

दीड दशकांच्या कारकीर्दीत धडाडीची क्रीडा पत्रकारिता करणाऱ्या विनायक राणे यांची आत्माराम मोरे क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विनायक याने 2003 साली युवा सकाळमधून आपली क्रीडा पत्रकारिता सुरू केली आणि ती गेली 12 वर्षे महाराष्ट्र टाइम्समध्ये धडाक्यात सुरू आहे. त्याने प्रो कबड्डी, चेन्नई ओपन, हॉकी विश्वचषक, युवा फिफा विश्वचषकासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन भारताच्या अनेक शहरांमध्ये जाऊन केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content