Details
जोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, जोगेश्वरी पश्चिम बाजूकडील गेल्या् अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. एकूण तीन विकासक या रस्याच्या आराखड्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. येथील पात्र झोपडीधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्यासत येईल. परंतु ५६ झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत समस्या निर्माण झाल्याेमुळे त्यांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हााधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे केली. त्यांनी त्वरीत ती मागणी मान्य केली.
यावेळी नगरसेविका राजुल पटेल, मनपा उपायुक्त किरण आचरेकर, सहाय्यक आयुक्त गायकवाड, उपजिल्हााधिकारी कोळेकर व स्थानिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये १४ मच्छिमार वसाहती महानगरपालिकेने घोषित केल्या असून १५ वसाहतींच्या जनगणनेचे काम आयुक्त, मत्य्स व्यवसाय विभाग यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवांच्या नावाने सात-बारा उतारा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.”
“केएचएल न्यूज ब्युरो