HomeArchiveचौकीदार सो रहा...

चौकीदार सो रहा है..

Details
चौकीदार सो रहा है..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
राफेल करार, त्यातील गुंतागुंत, वाढलेली किंमत यावरून किती गदारोळ उठला होता. तेव्हा प्रामाणिक चौकीदारावर झोपा काढत असल्याचे आरोप झाले होते. दु:खी, कष्टी मनांनी त्यावेळी आक्रंदून चौकीदार चोर नसल्याचा, झोपलेला नसल्याचा, देशाच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी अहर्निश खपत असल्याचा, दिवसरात्र एक करत असल्याचा निर्वाळा भारतीय जनमानसाला देण्याचा प्रयत्न केला होता. रिलायन्सचे नावही स्पर्धेतूनच पुढे आल्याचा, चौकीदाराचा त्याच्याशी काहीएक संबंध नसल्याचा एक उपखुलासाही वारंवार केला गेला. जीव तोडून केला गेला. सर्वोच्च न्यायालयाला सरकारने दिलेल्या इंग्रजी तर्जुम्यातील भाषा नीट न समजल्यामुळे न्यायालयाचाही गैरसमज झाला. पण न्यायालयानेही चौकीदाराच्या भलेपणाचे प्रमाणपत्र दिले. यामुळे भक्तांचा जीव भांड्यात पडला. ५६ इंचाची छाती अभिमानाने फुलून आली, मान ताठ झाली. न्यायालयाची दिशाभूल केल्याचा ओरडा काही क्षुद्र जीवांनी केला. पण न्यायालयानेच ते मनावर न घेतल्याचे दाखवले. न्यायालयाला इंग्रजी समजत नाही, भाषांतर नीट करता येत नाही हेही जनतेने पचवून घेतले.

त्यानंतर पुलवामा हल्ला झाला. तेव्हाही चौकीदार सो रहा है.. असा गदारोळ राहुल गांधी आणि कंपनीने केला. पण चौकीदार स्थितप्रज्ञ होता. धीरोदात्तपणे पुढची योजना आखत होता. अवघ्या बारा दिवसांत पाकिस्तानात जाऊन आपल्या लढाऊ विमानांनी कल्ला केला, जैशचा तळ उद्ध्वस्त केला. दु:ख, संतापाची लाट ओसरून जनतेत आनंदाची लाट पसरली. चौकीदार जागा आहे याचे धडधडीत पुरावे मिळाले. भक्तांनी तर आनंदकल्लोळ केला. चौकीदार झोपलेला नाही हे भारताच्या प्रत्युत्तराने दाखवून दिले आहे. आता बोला.. असे आव्हानात्मक संदेश व्हायरल विद्यापीठाच्या स्नातकांनी आवेशाने पुढे धाडले. चौकीदार स्वत:च जाकिटाच्या खिशात बॉम्ब भरून विमानातून पाकिस्तानात सीमापार गेले आणि घातकी बॉम्बफेक करून परतले, असा विजयोन्माद पसरला. पुन्हा विरोधी पक्षांनी दृष्ट लावली. पुरावे मागण्याचे धार्ष्ट्य केले. जैशचा तळ उद्ध्वस्त झाला, तीनशे दहशतवादी मेले म्हणता तर एक तरी फोटो दाखवा, म्हणायला लागले. इतकेच काय तर शहीद जवानांच्या पत्नीही पुरावे मागू लागल्या. यापेक्षा देशद्रोही असल्याचा पुरावा कोणता, असा एकच गलका भक्तांनी केला. कधी नव्हे ते सैन्यदल प्रमुखांनी लागोपाठ पत्रकार परिषदा घेतल्या, नुकतीच नौदल प्रमुखांनीही पत्रकार परिषद घेतली. दहशतवादी समुद्रमार्गे आले तरी सोडणार नाही, असा इशारा दिला.

निवडणुकांची घुसळण आता सुरू होणार असताना देशभक्तीची अशी लाट चौकीदाराच्या पक्षाला उपयोगी येऊ शकते, अशी टीका विरोधी पक्ष असूयेने करत आहेत. पण देश सर्वोच्च, देशाचे संरक्षण सर्वोच्च, असे चौकीदारानेच जाहीर केले आहे. चौकीदार जागा आहे, खंबीर आहे, यावर विश्वास ठेवायला हवा, असे वाटायला लागत असतानाच आता राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातूनच चोरीला गेल्याची माहिती सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली. यातली मेख अशी की ज्या सर्वोच्च न्यायालयाने इंग्रजी मजकुराचा अर्थ चुकीचा लावला असे सरकारचे म्हणणे होते त्याच न्यायालयाने राफेल कराराची सुनावणी वेगळ्या मुद्द्यांवर पुन्हा सुरू केली आहे. राफेलची नेमकी किंमत कीती, करारातील तरतुदी काय हा तपशील सरकार गोपनीयतेच्या नावाखाली द्यायला तयार नाही याबद्दल विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतले होते. न्यायालयाकडेही बोट दाखवले होते. त्यानंतर आता किंमतीच्या मुद्द्यावर न्यायालयाने सुनावणी सुरू केली आणि दुर्दैव असे की नेमकी तीच कागदपत्रे चोरीला गेली आहेत. संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रे चोरीला जाऊ शकतात तीही अशा निर्णायक टप्प्यावर हे सर्व चौकीदाराबद्दल संशयाचे धुके निर्माण करणारे तर आहेच. त्याहून दुर्दैव असे की द हिंदू ने मात्र या कराराशी संबंधित काही कागदपत्रांच्या आधारे मूळ करार आणि आताचा करार यातील तफावत, किंमतवाढ, भ्रष्टाचार रोखणारी, दर्जाहीनतेची जबाबदारी निश्चित करणारी कलमे कशी वगळली, बँक गॅरंटीचे कलम काढल्याने किंमत कशी वाढली, संरक्षण खात्याचे आक्षेप अशी सारी लक्तरे कधीच चव्हाट्यावर आणली आहेत.

‘राफेल’संबंधी महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून कर्मचाऱ्याकरवी चोरीला गेली आहेत, ही माहिती अधिकृतपणे न्यायालयात सांगितली गेली. त्यामुळे उडालेली खळबळ काहीच नाही असा पवित्रा सरकार आता घेत आहे. अशी संवेदनशील कागदपत्रे चोरीला जातात याबद्दल किंचितही खेद व्यक्त न करता, कराराची गोपनीय माहिती उघड करणारी दोन वर्तमानपत्रे आणि एका ज्येष्ठ वकिलाविरोधात सरकार कारवाई करणार आहे. ही गोपनीय माहिती म्हणजे काय तर, सरकारच्या लपवाछपवीचे भांडे फोडणारा तपशील. जो द हिंदू ने उजेडात आणून पत्रकारितेचा धर्म निभावला आहे. या सगळ्याबाबत सरकारने खरे तर प्रांजळ आणि प्रामाणिक भूमिका घेऊन बाजू मांडायला हवी. पण सरकारच्यावतीने बोलणाऱ्या सर्वांची आणि भक्तांची या बातम्यांनंतर जणू दातखिळीच बसली आहे. खंबीर म्हणून नावाजला जाणारा चौकीदार आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना पत्रकारांवर दडपण आणून त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी चौकीदाराने झोपेचे सोंग घेतले आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content