Details
गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाबाबत रविवारी दादरमध्ये मार्गदर्शन शिबीर!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, सहकारी कायदा व उपविधीबाबत मोफत “मार्गदशन शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर रविवार दि. १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत, मुंबईतील दादर पूर्व येथील शारदाश्रम सभागृहात होत आहे.
शिबिराचे उद्घाटन मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बँकेचे संचालक व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर उपस्थित असतील. हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
विविध विषयवार हौसिंग फेडरेशनचे सचिव ऍड डी. एस. वडेर, प्रसिद्ध आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू, बी. ई. बिलिमोरिया आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. एल. कपाडिया, आर्किटेक्ट सौरभ चॅटर्जी, अमितकुमार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष अमित परूळेकर, अजितकुमार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष अजित ठाकूर आणि मुंबई बँकेचे उपव्यवस्थापक उदय दळवी मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात खालील विषयावर चर्चा होईल :
* संस्थेचे सभासदत्व, नामांकन आणि व्यवस्थापन.
* सदनिका हस्तांतरण (ट्रान्स्फर),प्रीमियम आकारणी व बिनभोगवटा शुल्क.
* घटनादुरूस्तीनुसार गृहनिर्माण संस्थांची नवीन निवडणूक कार्यपद्धती.
* कलम १०१ अंतर्गत वसुलीची कार्यपद्धती व अंमलबजावणी
* घटनादुरूस्तीनुसार मोफा कायदा आणि त्याअंतर्गत अभिहस्तांतरण व मानीव हस्तांतरण
* अभिहस्तांतरण व स्वयं-पुनर्विकास
* लेखापरीक्षण, तपासणी व चौकशी
* प्रश्नोत्तरे
या शिबिराला गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारी सदस्य, तसेच सभासदांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई हौसिंग फेडरेशनचे खजिनदार डी. एन. महाजन, वसंतराव शिंदे, यशवंत किल्लेदार, हेमंत दळवी व सविता झेंडे यांनी केले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो