Details
गृहनिर्माण क्षेत्रात कार्य करणार – गोपाळ शेट्टी
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर मुंबई लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत माझा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. याचे खरे श्रेय जाते ते महायुतीच्या कार्यकर्ते, सर्व आमदार, नगरसेवकांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना. कारण त्यांच्या अथक परिश्रमाचे चीज आज झाले आहे, असे भावनिक मत खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केले.
यापुढे गृहनिर्माण क्षेत्रात कार्य करण्याचा माझा मानस आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले.
ते भारतीय जनता पार्टी, दहिसर विधानसभा आमदार मनीषा चौधरी यांच्यातर्फे आयोजित विद्यामंदिर शाळा, दहिसर पूर्व येथे भव्य सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक जगदीश ओझा यांनी केले. नुकतीच खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मागणीवरून मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत मुंबईतील रखडलेल्या विविध विकसनशील प्रकल्पांसदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. परदेशी यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना मुंबईतील रखडलेल्या विकसनशील प्रकल्पांसंदर्भात पॉलिसी/सर्क्युलर धोरण आखण्याचे निर्देश दिले होते.
खासदार गोपाळ शेट्टी यांना विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा भेट म्हणून देण्यात अली. तसेच शाल, श्रीफळ आणि भव्य पुष्पमाला देऊन त्यांना गौरविण्यात आले. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी ७ लाख ६ हजार ६७८ एवढी मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना ३ लाख ६५ हजार २४७ इतक्या मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार विलास पोतनीस, भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष श्रीकांत पांडे, नगरसेवक हर्षद कारकर, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक जितेंद्र पटेल, नगरसेविका शीतल म्हात्रे, नगरसेविका तेजश्री घोसाळकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, दहिसर विधानसभा महायुतीचे सर्व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ‘दहिसर गौड सारस्वत ब्राम्हण’, मराठी, गुजराती, जैन भाषिक समाज आणि संस्थांचे प्रतिनिधी, नामवंत व्यावसायिक, समाजसेवक, नावाजलेल्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ऍड. सतीश शर्मा, अजित मांजरेकर, विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई, ‘रोटरी क्लब ऑफ दहिसर’चे पदाधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो