Friday, October 18, 2024
HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

Details
खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...
Skip to content