Details
खारफुटी वाचविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा – मोहित भारतीय
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘चला खारफुटी वाचवू’ या मोहिमेत अनेक सेलिब्रेटिजसह स्थानिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. ‘खारफुटी वाचवा, मुंबई वाचवा’चा वर्सोवा येथे नारा घूमला. खारफुटी वाचविण्यासाठी मुंबई महापालिकेने हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमिताने भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या नेतृत्वापरखाली मुंबईत खारफुटी (मँगरोव्ह) वाचवा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘चला खारफुटी वाचवू या (सेव्ह मँग्रोव्ह)’ या मोहिमेची बुधवारी 5 जूनपासून अंधेरी पश्चिम वर्सोवा येथील जॉगर्स पार्क लोखंडवाला येथून सुरूवात झाली. या मोहिमेत अभिनेत्री दीपशिखा नागपाल, अदिती गोवित्रीकर, अभिनेता अमर उपाध्याय, बिंदू दारा सिंह यांच्यासह किश्वर मर्चंट, तनाज ईरानी, बख्तियार ईरानी, अली असगर, सुयश राय, चार्ली (इंस्टा प्लस ऐक्टर), ईवा ग्रोवर, लिजा मलिक, राज प्रेमी आणि दिग्दर्शक राजेश रणशिंगे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘आम्ही सिनेसृष्टी काम करत असलो तरी, खारफुटी संरक्षण करण्याच्या मोहिमेला आमचा पाठिंबा आहे’, असे अभिनेत्री दीपशिखा नागपाल म्हणाल्या. आपण देशाचे जागरूक नागरिक आहोत. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे. मुंबईतील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खारफुटीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. मुंबईकरानी याकामी जागरूक राहवे, असे आवाहन मोहित भारतीय यांनी केले. खारफुटी नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य व्यक्ती हेल्पलाईनच्या माध्यमातून सूचना देऊ शकते आणि संबधित अधिकारी तत्काळ कारवाई करू शकतात. त्यामुळे हेल्पलाईन लवकर सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे भारतीय म्हणाले.
”
“केएचएल न्यूज ब्युरो