HomeArchiveकाष्ठशिल्पाकृतीतून श्रीराम मंडाले...

काष्ठशिल्पाकृतीतून श्रीराम मंडाले पिता-पुत्रीने घडवले जुन्या मुंबापुरीचे दर्शन!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
काष्ठशिल्पकला ही एक हस्तकला आहे. जपान, चीन, काश्मीर, राजस्थान याठिकाणी काष्ठकलेला अगदी राजमान्यता मिळालेली दिसते. राजस्थानातील चितोडगढ जिल्ह्यातील बस्ती येथील प्रभात जी सुधार यांनी ३५५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम गणगौर अर्थात पार्वतीरूप काष्ठमूर्ती साकारली होती. उदयपूरच्या महाराजा जगतसिंह यांनी मारवाडवरून काही कारागिरांना उदयपूरला बोलावून खराद नावाच्या कला प्रकारात म्हणजे एकाच लाकडी ठोकळ्यात कोरीव काम करीत राजप्रासाद सुशोभित करून घेतले. चीनमधील चुनहुई येथे एका काष्ठकोरीव काम करणाऱ्या कारागिराने ४० फूट लांब लाकडावर सुंदर नक्षीकाम करून चीन संस्कृती आणि चीन दैनंदिनी कोरली की, जी कलाकृती गिनीज बुकमध्ये नोंदली गेली!

ही सारी लाकूड कलाकुसर आणि काष्ठशिल्पाकृतींची चर्चा करण्याचा उद्द्येशही जुळून आला आहे. मुंबापुरीतील जाहिरात संस्थेत आर्ट डायरेक्टर म्हणून कल्पना निर्माण करणारे चित्रकार श्रीराम मंडाले यांनी अगदीच आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या कलाकृती साधल्या आहेत. टिकवूड म्हणजे सागाच्या लाकडावर विशिष्ट स्तर तयार करून लेसर कटिंग आणि हस्तकौशल्य यांच्या सहाय्याने कलाकृती साकारल्या आहेत.

हे एक असं प्रदर्शन की, ज्या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती ह्या मुंबई शहराशी निगडित लहान-लहान आकृतिबंधाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फ्रेमच्या चौकटीत बसविण्याचा आणि त्याचबरोबर आधुनिक कलाप्रवाहातली पेंटिंग्ज सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न श्रीराम मंडाले यांनी केला आहे. श्रीराम यांचं काम म्हणजे बर्मा टिक वुडवर कोरलेलं मुंबापुरीतलं पुरातन किंवा अगदी जूने रूपडं.. जणू सृजनच.. पारंपारिक शास्त्रीय कलेचं..

चीनच्या ४० फुटी काष्ठ कारागिरीचं गिनीज बुकात नोंद घेण्यात आली, परंतु श्रीराम मंडालेच्या सुमारे तीसेक काष्ठ शिल्पाकृती म्हणण्यापेक्षा काष्ठ-पेंटिंग्ज ज्या ५ फुटी कलाकृती आहेत. अर्थात ४० फुटांहून अधिक स्वरूपात काम आहे. त्याचीही गिनीज बुकात नोंद व्हावयास हवी!

लाकडावरील कोरीव कलेचं आणि शिल्पकलेचे उत्तम ज्ञान असलेल्या श्रीराम यांनी त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीतून आणि तांत्रिक ज्ञानातून कापड, धातू आणि काँक्रीटला त्यांच्या मनाप्रमाणे वळवून वागायला लावलं आहे. त्यांनी निवडलेले काष्ठ पेंटिंग्जचे विषय म्हणजे चित्रकाराच्या ठायी असलेली सर्जनशीलता आणि सधनता कायम ठेवतात. लाकूड, हस्तदंत, दगड इत्यादी पृष्ठभागावर अर्ध उठावात केलेल्या नक्षीकामास अथवा कोरीव कामास ‘उत्कीर्णन’ असे म्हणतात. श्रीराम मंडाले यांनी नेमकं हेच केले आहे. ९” बाय १३” आकारातील “ओपन कॅनव्हास” शीर्षकाची कलाकृती म्हणजे १८८० च्या दशकातील सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय ही हेरिटेज इमारत. सुमारे १६० वर्षांचा इतिहास असलेली इमारत केवळ ९” बाय १३” आकारात व्यक्त करण्याचा अगदीच अशक्य वाटणारा प्रयोग सहजयोगाने पूर्ण यशस्वी करून श्रीराम मंडाले यांनी जादुई किमया केलीय. २७” बाय ३८” आकारातील लव्ह अफेअर वुईथ कलर त्याच आकारातील लॉस्ट ट्रेझर, द प्रीनिज बाऊंटी, ईस्ट मिट्स वेस्ट अशा एकाहून एक थक्क करणाऱ्या कलाकृती पाहताना रसिक मंत्रमुग्ध न होईल तर नवलच.

आश्चर्याचे सुखद धक्के देत देत रसिक मुंबापुरीच्या जुन्या इतिहासाला जागृत करीत असतानाच त्यांची कन्या श्रद्धा मंडाले हिने चितारलेल्या तशाच काहीशा विषयावरील कलाकृती पाहायला मिळतात. मुंबईत सर्वच दृश्य पाहयला मिळतात. कानातला मळ काढणारा, मालिश करणारा, बूट पोलिश करणारा, रस्त्यावर कटिंग-दाढी करणारा, मच्छी विक्रेती आणि बरेच काही..

एकूणच “बाप-बेटी”ची मुंबापुरीवरील माया-प्रेम व्यक्त करण्याची अन कलारसिकांना अनोखी भेट देण्याची पुनर्निमाणाची कलाकुपी फारच स्मृतीप्रवण ठरणारी आहे. हे प्रदर्शन येत्या ९ जूनपर्यंत मुंबईच्या जहांगीर कलादालनाच्या हिरजी कलादालनात रसिकांना पाहता येईल.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...

इस्रायलमधले नेतन्याहू सरकार डामाडोल

इस्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी गाडी आयझेनकोट या दोघांनाही स्पष्ट बहुमताचा मार्ग नाही. सुरुवातीच्या 50% मतमोजणीनंतर नेतन्याहू यांच्या गटाला 53-55 जागा आणि आयझेनकोट यांच्या विरोधी गटाला 48-49 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अरब पक्षांना 16...
Skip to content