Details
कार्टूनिस्ट कंबाईन्स संघटनेच्या अध्यक्षपदी संजय मिस्त्री!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या कार्टूनिस्ट कम्बाईन्स या व्यंगचित्रकाराच्या संघटनेच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.
संजय मिस्त्री गेली चाळीस वर्षे पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करतात. आचार्य अत्रे पुरस्कार. मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट व्यंगचित्रकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या नावावर 14 पुस्तके आहेत. उत्कृष्ट वक्ते म्हणूनही त्यांचा परिचय आहे.
कार्टूनिस्ट कंबाइन्सने निवड केलेली नवीन कार्यकारिणी. संजय मिस्त्री – अध्यक्ष. राजीव गायकवाड – उपाध्यक्ष. योगेंद्र भगत – सचिव. निखिल मुळ्ये – कोषाध्यक्ष. अनंत दराडे, सुहास पालीमकर, अशोक सुतार – सदस्य. याप्रसंगी “सगळ्या व्यंगचित्रकारांना एकत्र घेऊन, व्यंगचित्रकला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदरणीय बाळासाहेब ठाकरे. आर. के. लक्ष्मण ही दोन व्यंगचित्रकलेची विद्यापीठे आहेत. ती व्यंगचित्रकलेची उंची कायम राखण्यासाठी अनुभवी आणि जाणकारांच्या कार्यशाळा घेण्याचा मानस आहे” असे मत कार्टूनिस्ट कंबाइन्सचे नवीन अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी व्यक्त केले.”
“केएचएल न्यूज ब्युरो