HomeArchiveकारागृह ग्रंथालयाला रामचंद्र...

कारागृह ग्रंथालयाला रामचंद्र प्रतिष्ठानची भेट

Details
कारागृह ग्रंथालयाला रामचंद्र प्रतिष्ठानची भेट

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
तळोजा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांमध्ये वैचारिक व सकारात्मक पुनर्वसन झपाट्याने व्हावे तसेच त्यांच्यातील संस्कारक्षम विचारांना प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सुमारे 125 सुप्रसिद्ध साहित्यिकांची संस्कारमय पुस्तके कारागृहास नुकतीच भेट देण्यात आली. या ग्रंथसंपदामध्ये सुप्रसिद्ध लेखिका गिरीजा कीर यांचे कारागृहातील कैद्याच्या जीवनावर आधारित नामदेवाची चित्तरकथा व अन्य पुस्तके, शिरीष पै, डॉ. विजया वाड, रेखा नार्वेकर, देवेंद्र भुजबळ तसेच अन्य सुप्रसिद्ध साहित्यक आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या दर्जेदार पुस्तकांचा समावेश आहे.

रामचंद्र प्रतिष्ठानच्या संचालिका नयना शिंदे तसेच अशोक शिंदे यांनी ही ग्रंथसंपदा कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुलेकर यांच्याकडे सुपूर्द केली. याचा उपयोग बंदिवानांमध्ये वैचारिक समृद्धता वाढविण्यास व इथून बाहेर पडल्यानंतर त्यांना समाजात सत्कार्य करण्यास प्रवृत्त होण्यास मदत होईल, असा विश्वास कुलेकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ तुरूंगाधिकारी हरिभाऊ मिंड, शिक्षक नामदेव शिंदे व गणपत तागड तसेच कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content