Details
कारगिल विजयदिनाची अल्ट्रा मॅरेथॉन!
25-Sep-2019
”
विनय गजानन खरे..
कारगिल विजय दिनाच्या २० वर्षानिमित्त कारगिल ते कोहिमा अल्ट्रा मॅरेथॉन ‘ग्लोरी रन’ मोहीम येथील युद्ध स्मारकवरून जम्मू काश्मीर वायूसेनेचे प्रमुख व्हाईस मार्शल पी एम सिन्हा यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. भारतीय वायूसेनेची खरी परंपरा नि प्रेरक ब्रीद वाक्य ‘टच द स्काय विथ ग्लोरी’ यासाठी के२के हे अभियान कोहिमा युद्धभूमी नागालँडपर्यंत चालवले जाईल.
उत्तर भारताच्या पूर्वेकडे कोहिमा तर उत्तरेकडे कारगिल या महत्त्वाच्या दोन लष्करी चौक्या आहेत. इतर १९४४ नि १९९९ मध्ये दोन मोठ्या लढाया झाल्या. त्याच्या स्मृत्यर्थ ही धावमोहीम भारतीय वायूदलाने हाती घेतली आहे. याचा समारोप ६ नोव्हेंबर रोजी होईल. यात २५ वायूवीर सहभागी झाले असून हे पथक ४५ दिवसात ४५०० किमी प्रवास करून रोज सरासरी १०० किमी अंतर कापेल. या धावण्याद्वारे पायी चालणाऱ्यांची सुरक्षितता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देणे यासह ज्या वीर जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहणे, ही उद्दिष्ट्ये समोर आहेत. याआधी ६ सप्टेंबर रोजी सेना प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष वायूसेनाप्रमुख बी सी धनोआ यांनी नवी दिल्लीत वायूभवन येथे स्क्वाड्रन लीडर सुरेश राजदान यांच्याकडे ‘मशाल’ सोपवली.
अत्यंत कठीण चाचण्यातून या पथकाची निवड करण्यात आली असून त्यांना लेह हवाई तळावर प्रशिक्षण दिले गेले. या चमूत एक महिला अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट ऋषभजीत कौर आणि ५१ वर्षीय वॉरंट अधिकारी इंद्रपाल सिंह यांच्यासह वॉरंट अधिकारी नि एअरमन सहभागी झालेत. याचे नेतृत्त्व सुखोई ३०चे पायलट राजदान करीत आहेत. हा चमू द्रास लेह मनाली महामार्गाच्या जाणार आहे जिथे सरासरी उंची १३ हजार फूट आहे तर टांगलांगला पर्वतावरून जाताना ही उंची १७ हजार ४८० फूट इतकी असेल. हे पथक बर्फाच्छादित डोंगररांगा, थंड पाण्याच्या अनेक जलधारा पार करीत जाईल.
लडाख क्षेत्रातील काही मार्ग नमिकीला (१२१९८) फूट, फाउंटला (१३५१०) फूट, टांगलांगला (१७४८०) फूट, लाचुंगला (१६६१३) फूट, बरलांचला (१६०४०) फूट, रोहतांग (१३१२९) फूट या उंचीवरून हे पथक जाईल. या साहसी मोहिमेदरम्यान लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर परदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड या विविध भागातून कम्पिंग नि रस्त्यावरील समस्या, हिमपात व्यवस्थापन, जीवन जगण्याची कला, पाऊस आणि वातावरणाचे बदल झेलत हे पथक मार्गक्रमण करेल. भारतीय वायूदल आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये साहसिक जोश भरण्यासाठी अशा उपक्रमांना चालना देत आहे. त्यातून राष्ट्रीय नि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गौरव मिळवले आहेत. नाना प्रकारच्या साहसांनी या पथकात संघभावना नि अन्य गुणांचा विकास ही या दलाची पायाभरणी आहे.”
विनय गजानन खरे..
कारगिल विजय दिनाच्या २० वर्षानिमित्त कारगिल ते कोहिमा अल्ट्रा मॅरेथॉन ‘ग्लोरी रन’ मोहीम येथील युद्ध स्मारकवरून जम्मू काश्मीर वायूसेनेचे प्रमुख व्हाईस मार्शल पी एम सिन्हा यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. भारतीय वायूसेनेची खरी परंपरा नि प्रेरक ब्रीद वाक्य ‘टच द स्काय विथ ग्लोरी’ यासाठी के२के हे अभियान कोहिमा युद्धभूमी नागालँडपर्यंत चालवले जाईल.
“उत्तर भारताच्या पूर्वेकडे कोहिमा तर उत्तरेकडे कारगिल या महत्त्वाच्या दोन लष्करी चौक्या आहेत. इतर १९४४ नि १९९९ मध्ये दोन मोठ्या लढाया झाल्या. त्याच्या स्मृत्यर्थ ही धावमोहीम भारतीय वायूदलाने हाती घेतली आहे. याचा समारोप ६ नोव्हेंबर रोजी होईल. यात २५ वायूवीर सहभागी झाले असून हे पथक ४५ दिवसात ४५०० किमी प्रवास करून रोज सरासरी १०० किमी अंतर कापेल. या धावण्याद्वारे पायी चालणाऱ्यांची सुरक्षितता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देणे यासह ज्या वीर जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहणे, ही उद्दिष्ट्ये समोर आहेत. याआधी ६ सप्टेंबर रोजी सेना प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष वायूसेनाप्रमुख बी सी धनोआ यांनी नवी दिल्लीत वायूभवन येथे स्क्वाड्रन लीडर सुरेश राजदान यांच्याकडे ‘मशाल’ सोपवली.”
“अत्यंत कठीण चाचण्यातून या पथकाची निवड करण्यात आली असून त्यांना लेह हवाई तळावर प्रशिक्षण दिले गेले. या चमूत एक महिला अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट ऋषभजीत कौर आणि ५१ वर्षीय वॉरंट अधिकारी इंद्रपाल सिंह यांच्यासह वॉरंट अधिकारी नि एअरमन सहभागी झालेत. याचे नेतृत्त्व सुखोई ३०चे पायलट राजदान करीत आहेत. हा चमू द्रास लेह मनाली महामार्गाच्या जाणार आहे जिथे सरासरी उंची १३ हजार फूट आहे तर टांगलांगला पर्वतावरून जाताना ही उंची १७ हजार ४८० फूट इतकी असेल. हे पथक बर्फाच्छादित डोंगररांगा, थंड पाण्याच्या अनेक जलधारा पार करीत जाईल. ”
“लडाख क्षेत्रातील काही मार्ग नमिकीला (१२१९८) फूट, फाउंटला (१३५१०) फूट, टांगलांगला (१७४८०) फूट, लाचुंगला (१६६१३) फूट, बरलांचला (१६०४०) फूट, रोहतांग (१३१२९) फूट या उंचीवरून हे पथक जाईल. या साहसी मोहिमेदरम्यान लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर परदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड या विविध भागातून कम्पिंग नि रस्त्यावरील समस्या, हिमपात व्यवस्थापन, जीवन जगण्याची कला, पाऊस आणि वातावरणाचे बदल झेलत हे पथक मार्गक्रमण करेल. भारतीय वायूदल आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये साहसिक जोश भरण्यासाठी अशा उपक्रमांना चालना देत आहे. त्यातून राष्ट्रीय नि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गौरव मिळवले आहेत. नाना प्रकारच्या साहसांनी या पथकात संघभावना नि अन्य गुणांचा विकास ही या दलाची पायाभरणी आहे.”