HomeArchiveकाय दडलंय 'मराठी...

काय दडलंय ‘मराठी पंतप्रधान’ पदामागे?

Details
काय दडलंय ‘मराठी पंतप्रधान’ पदामागे?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
अटकेपार झेंडा रोवणारा मराठी माणूस स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झालीत, परंतु देशाच्या पंतप्रधानपदी आजतागायत बसू शकला नाही. मराठी भाषा जाणणारे आणि काहीसे बोलणारे पंतप्रधान होते. नरसिंह राव, मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंह (त्यांचं पुण्यात काही काळ शिक्षण झाले होते), अटल बिहारी वाजपेयी (इंदूरला मराठी वस्ती होती) यांना मराठी भाषेचं ज्ञान होते. मोगलकालीन मराठा राज्य उत्तरेपर्यंत पसरलेले होते. त्यावेळी हिंदी प्रदेशात मराठी भाषा सर्रास बोलली जात असे. अशा या महाराष्ट्राच्या मराठा गड्यांनी मोगलांना त्यांची औकात दाखवली होती. त्याच महाराष्ट्रातील मराठी माणूस दिल्लीच्या तख्ताकडे डोळे लावून बसला आहे. हिंदूंना अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभे राहवे ही जशी मनोमन तीव्र इच्छा आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणसाची मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा हे स्वप्न आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना लालबहाद्दूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद देण्याचे काँग्रेस पक्षाकडून ठरले होते. मात्र नेहरू घराण्याशी एकनिष्ठ यशवंतराव चव्हाण यांनी ही बाब इंदिरा गांधी यांना सांगितली आणि तिथेच चव्हाणांचा घात झाला, पर्यायाने मराठी माणसाचा घात झाला. इंदिरा गांधींनी यशवंतरावांना एक दिवस थांबा, असे सांगितले आणि त्या दरम्यान इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत हालचाली करून पंतप्रधानपदी स्वतःचे नाव जाहीर करून टाकले आणि नेहरूनिष्ठ यशवंतराव यांचे इंदिरा गांधींनी नंतर कसे हाल केले हे सर्वांनाच माहीत आहे.

दुसरे.. दोन दगडावर पाय ठेवणारे जाणते राजे शरद पवार. यांनीही पंतप्रधानपदासाठी हालचाल केली होती. त्यावेळी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पवारांच्या स्वप्नाला छेद दिला. त्यांनी काही पत्रकारांना बोलावून शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी दोन हजार कोटी खासदारांना वाटत असल्याचे सांगितले आणि या बातमीने देशात वैचारिक भूकंप झाला. या बातमीने पवारांचे पंतप्रधानपद हुकले. शेवटी काँग्रेस पक्षच तो, तोच त्यांच्या उमेदवाराचा पराभव करू शकतो. नारायण राणे ३९ वर्षे शिवसेनेत राहिले आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस पक्षात गेले. त्यांना काँग्रेसने कसे चुचकारात ठेवले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची कशी वाट लावली हे सर्वश्रूत आहे.

‘पंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस!’ ही पुडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच लोकसभेच्या निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सोडून दिली आहे. मराठी पंतप्रधान आतापर्यंत झाला नाही हे महाराष्ट्राचं मोठं दुखणं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही ते स्वप्न होते. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर ‘पक्षाच्या विजयाचे श्रेय जसे नेतृत्त्वाने घ्यायचे, तसे पराजयाचे अपश्रेयही घेतले पाहिजे’ असे विधान करून टीका केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्या पार्श्वभूमीवर गडकरींचे हे विधान असल्याने मोदी भक्तांच्या पायाखालाची वाळू घसरली आहे. गडकरीचं विधान आणि फडणवीसांचं वक्तव्य यात राजकीय भाकिते दडली आहेत. सद्या भाजपाला शिवसेनेची अत्यंत गरज आहे आणि सेनेला आपलंसं करण्यासाठी अनेक ऑफर ठेवल्या जात आहेत. गेल्या चार वर्षांत सेनेला अपमानित करून राज्यातून तिला हद्दपार करण्याचे कारस्थानही भाजपाकडून झाले.

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाने स्वतःचा महापौर बसविला. शिवसेनेकडे २४ नगरसेवक तर भाजपाकडे फक्त १४ नगरसेवक असताना महापालिकेत असलेली भाजपाची सत्ता ही लोकशाहीची मूल्य तुडविणारी आहे. अहमदनगरच्या मतदारांनी शिवसेनेला सत्ता दिली असताना भाजपाने लबाडीने महापालिका काबीज केली. असे असले तरी याबाबत राज्यात नैतिकतेचे गुणगान गाणारे भाजपा नेते काय लायकीचे आहेत आणि लोकशाहीचे वस्त्रहरण केव्हाही ते करू शकतात हे लोकांनी याची देही, याच डोळा पाहिले आहे. कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेला जवळ करण्यासाठी त्यांनी मराठी पंतप्रधान पदाचं लॉलीपॉप दाखविण्याचा प्रयत्न केला असावा. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या उमेदवार असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाबरोबर असूनही काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठींबा देऊन मराठी राष्ट्रपती दिल्लीत बसविला. तीन राज्यातील विधानसभेतील पराभव आणि जनाधाराचा टीआरपी घसरत चालल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांची दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. त्यामुळेच त्यांनी येत्या पुढील काळात मराठी माणूस पंतप्रधान पदावर असे आश्वासक विधान केले आहे.

‘मराठी माणूस पंतप्रधान’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भावनिक साद घालणारे आहे. निवडणुकीच्या मोक्यावर राम मंदिराचा विषय घेऊन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सर्वांची अडचण करून टाकली. शिवाय आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया, खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि हिंदू आखाड्याचे साधू संत हे राम मंदिर उभारण्यासाठी ठाकरे यांच्या मागे ठाम उभे आहेत. असं चित्र यापूर्वी कधीच दिसले नाही. भाजपाच्या विरोधात वातावरण उभे करण्यात शिवसेना यशस्वी ठरली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढच्या काळात अनेक मराठी पंतप्रधान दिसतील असे लॉलीपॉप विधान करून सेनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबर तमाम मराठी जनतेलाही साद घातली आहे. फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला तो १६ व्या जागतिक मराठी संमेलनात आणि त्यांनी नेमकी ही संधी साधली. तीन राज्यांत पराभव झाल्यानंतर मोदींना पर्याय शोधण्यास सुरूवात झाली. संघानेही त्यात उडी अगोदरपासून घेतली होती. तो पर्याय नितीन गडकरी हाच होता. त्याची चर्चाच उत्तरेकडील राज्यात होऊ लागली हे विशेष.

सर्वसाधारणपणे, मराठी पंतप्रधान होऊ नये म्हणून उत्तरेची राज्ये एकत्र येतात. ती परिस्थिती आता पूर्णतः बदलेली आहे. आता गडकरी बोलले म्हणजे संघाचा त्यांना पाठिंबा असणारच हे खरे राजकीय समीकरण आहे. भाजपाच्या अध्यक्षपदावरून लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करून गडकरींना आणण्यात आले. यामुळे संघाचे गडकरीप्रेम त्यावेळी स्पष्ट झाले होते. मोदी तेव्हाही होतेच. शिवराज सिंह, रमणसिंह, राजनाथ आणि वसुंधराही होत्या. या साऱ्यांना बाजूला ठेवून मंत्रीपद नसलेल्या नितीन गडकरींना संघाने पक्षाध्यक्षपद दिले होते. मनोहर पर्रीकर यांचे संरक्षणमंत्रीपद गडकरींना दिले जाईल असे वाटत होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची हिम्मत नव्हती. आता तीन राज्यातील परिस्थिती बदलल्याने मोदींना मुकाट्याने सर्व काही ऐकावे लागणार आहे. म्हणूनच नागपूरच्या या दोन नेत्यांनी संघाचा संदेश पोहोचविण्याचा विडा उचलेला दिसतो. गडकरी नकळत मोदींना पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगत आहेत. तर जागतिक मराठी परिषदेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला खुश करण्यासाठी येत्या ५० वर्षांत दिल्लीत अनेक मराठी पंतप्रधान दिसतील असे भाकीत करून संघाला आणि शिवसेनेला खुश करीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्धव ठाकरे यांचे संबंध पितापुत्रासारखे आहेत. त्यामुळे भविष्यात मराठी पंतप्रधान होण्यासाठी शिवसेना नक्की हातभार लावील. त्यामुळे भाजपा-शिवसेना हे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र येतील. यापूर्वी युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे होते. आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस असणार आहेत.”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content