HomeArchiveकाय आहे ब्लॅक...

काय आहे ब्लॅक बॉक्स नि फ्लाईट डेटा रेकॉर्डर?

Details
काय आहे ब्लॅक बॉक्स नि फ्लाईट डेटा रेकॉर्डर?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कोणत्याही विमानाचा अपघात झाला की भर असतो तो ही दोन उपकरणे शोधण्यावर. त्यातून नेमकं कारण कळतं ते विमान अपघातावेळी काय परिस्थिती होती! आताच अरणाचल प्रदेशात झालेल्या AN 32 विमान अपघात कशामुळे झाला हे नेमकं समजू शकलं नव्हतं ते संपर्क तुटल्याने. चीनची सीमा जवळ असल्याने तिथून काही घातपात झाला काय ही शंका अनेकांना होती. त्यामुळे मोठी शोधमोहीम हाती घेऊन विमानाचं काय झालं हे पाहिलं गेलं. विमानात निघालेले वाचण्याची शक्यता तशी फार कमी होती, कारण फार दिवस उलटून गेले होते. शोध घेण्यात येणारे अडथळे, घनदाट जंगल, उंचीवरचे ठिकाण हवामान अशा अनेक बाबी याच्याशी निगडीत आहेत.

आपण जाणून घेऊया, या दोन साधनांची कार्य नि उपयुक्तता. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यात अनेक बाबींची नोंद होते. गेली साठ वर्षे हाच ब्लॅक बॉक्स विमान अपघाताचा गुंता सोडवण्यास मदत करतो. अपघात होण्याचं नेमकं कारण काय, कशामुळे तो झाला, त्यावेळी विमानात काय स्थिती होती, आदींवर प्रकाश पडतो. कोणत्याही व्यावसायिक अथवा अन्य प्रकारच्या विमानात कॉकपिट व्हॉइस नि फ्लाईट डेटा रेकॉर्डर बसवणे सक्तीचे आहे. कामं दोघांची वेगवेगळी असली तरी त्याला ब्लॅक बॉक्स म्हंटलं जातं. कोणत्याही विमान उड्डाणासाठी त्याची मदत होत नसली तरी त्यांचे असणे अत्यावश्यक ठरते.

या दोन्ही साधनांमध्ये underwatar loketar bicon नावाची यंत्रणा असते जी पाण्याच्या संपर्कात येताच कार्यरत होते. हे उपकरण १४ हजार फूट खोलीतूनही संदेश पाठवू शकते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर C V R मध्ये वैमानिक आणि क्रु मेंबर्स तसेच हवाई मार्ग नियंत्रण सूचनांची नोंद केली जाते. यासह आजूबाजूच्या आवाजाचीही माहिती मिळते. त्यावरून भांडण, तणावसदृश्य परिस्थितीमुळे अपघात झाल्याचीही माहिती होते.

अपघातातही बचावतो कसा?

या दोन उपकरणांसाठी स्वतंत्र जागा ठेवताना कोणत्याही अपघातात ते सुरक्षित राहतील हे पाहिले जाते. पाणी, जमीन कुठेही पडले तरी सुरक्षित राहून आपलं काम करतील नि नष्ट होणार नाही याकडे लक्ष दिले जाते. ब्लॅक बॉक्स हा अतिशय कणखर, मजबूत अशा टायटेनिम धातूपासून बनविला जातो. कोणत्याही विमानात असलेल्या या साधनांच्या अनेक चाचण्या केल्या जातात. यात जो डेटा जमा केला जातो तो डिजिटली गोळा करतात. तो नष्ट होऊ नये म्हणून त्याला धक्का प्रतिबंधक शॉकप्रुफ बनवलं जातं, त्यांना एक तास अकराशे डिग्री तापमानपर्यंत ठेवलं जातं. शिवाय, ती उपकरणं दहा तास अडीचशे डिग्री तापमान सहन करू शकतात.

या बॉक्सला अंडर वॉटर लोकेशन बिकनसह बसवताना एक सेन्सरही लावला जातो. या सेंसरचा पाण्याशी संपर्क येताच तो कार्यरत होऊन संदेश पाठवणे सुरू करू लागतो. साधारण तीस दिवस विनावीज नि १४ हजार फूट खोल पाण्यातून संदेश पाठवतो. याचाच अर्थ खोलवर पाण्यात पडलेल्या विमानाचा शोध लावता येतो.

काळा नाही नारंगी

या उपकरणांसाठी ब्लॅक बॉक्स शब्द वापरला जात असला तरी वास्तवात मात्र तो नारंगी केशरी रंगाचा दिसतो. ब्लॅक बॉक्स हे माध्यमांनी दिलेले नाव असल्याचे सांगितले जाते. या रंगामुळे त्याचा शोध घेणे सोपे होते. C V R आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर F D R हे दोन्ही कॉकपिटमध्ये नाही तर विमानाच्या शेपटाच्या भागात बसवले जाते. जेणेकरून अपघात झाल्यास या दोन्ही साधनांना नुकसान कमीतकमी होईल. कारण, बहुतांश अपघात हे विमानाच्या पुढच्या भागात नि मधल्या भागात होऊन अधिक हानी होते.

हवाई दल प्रमुख म्हणतात..

अरूणाचल प्रदेशातील मेचूकजवळ झालेल्या भीषण अपघातात वायू दलाच्या तेरा जणांचा मृत्यू झाला. जवळपास आठवडाभराच्या अथक तपासणीनंतर विमानाचे अवशेष नि विचित्रावस्थेत मृतदेह सापडले. आम्हाला फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर मिळाले असून आम्ही त्याची सखोल तपासणी करून निश्चित कारणं शोधून काढू. ते हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमीच्या धुंडीगल दीक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलले. अपघातग्रस्त प्रदेश घनदाट अरण्याचा असून ढग नि ढगाळ हवामानामुळे अनेक अडचणी होत्या. त्यामुळे शोध घेण्यावर मर्यादा आल्या असेही हवाई दल प्रमुख म्हणाले.

आसामच्या जोरहट येथून निघालेल्या या विमानाचा अर्ध्या तासात संपर्क तुटून ते बेपत्ता झाले. प्रचंड यंत्रणा राबवून त्याचा शोध घेतला गेला. ११ जून रोजी त्याचे अवशेष १२ हजार फुटांवरील डोंगरावर, शोयोमी आणि सिअंग जिल्ह्याच्या सीमेवर गट्टे, लिपो गावाजवळ सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाचा अडीचशे फूट उंचीचा अंदाज चुकला नि विमान डोंगरात कोसळले तर अन्य एका माहितीनुसार ढग नि ढगाळ वातावरण याने वैमानिकाचा अंदाज चुकला असावा किंवा जमिनीपासून उंचीचा अंदाज देणाऱ्या यंत्रात बिघाड झाला असावा अशीही शक्यता वर्तवली जातेय. तथापि, या दोन्ही साधनांचा अभ्यास होऊन किती दिवसात त्याचा अहवाल येईल, अभ्यास होईल हे मात्र हवाई दल प्रमुखांनी सांगितलं नाही. त्यामुळे नेमकं कारण काय असेल याची उत्सुकता लागली आहे.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content