HomeArchiveएमआयटी वर्ल्ड पीस...

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा यंदाचा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ केरळच्या कोझीकोडे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. देबाशिश चॅटर्जी, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेते स्वानंद किरकिरे, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजचे जनक डॉ. एफ. सी. कोहली यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली.

पुरस्काराचे हे १५वे वर्ष असून, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ०२.३० वाजता पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभामंडपात होणार आहे. जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.

व्यवस्थापन अध्यापनाच्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल हार्वर्ड विद्यापीठात नेतृत्त्वगुणांचे शिक्षण देणारे व केरळच्या कोझीकोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. देबाशिश चॅटर्जी यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे. संसदीय कामकाजात निपुण असलेल्या उत्कृष्ट युवा खासदार अशी ओळख निर्माण करणार्‍या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे. आपल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या माध्यमातून श्रोत्यांना मनमुराद आनंद देणे, आपल्या गायनातून लोकजागृती करणार्‍या मुंबईतील सुप्रसिध्द गीतकार, पार्श्‍वगायक, लेखक, अभिनेते स्वानंद किरकिरे यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. सार्वजनिक औषधोपचार आणि आरोग्य रक्षण जनजागृती केल्याबद्दल डॉ. चंद्रकांत पांडव यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. कौंसिल ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) चे महासंचालक आणि  डिपार्टमेंट ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिचर्स (डीएसआयआर) चे सचिव डॉ. शेखर सी. मांडे यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे. भारतीय सॉफ्टवेयर उद्योगसमूहांना महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल टीसीएस, लिमिटेडचे माजी उपाध्यक्ष पद्मभूषण डॉ. एफ. सी. कोहली यांना ‘भारत अस्मिता विशेष जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी आपल्या देशाच्या नावलौकिकात भर टाकली, विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्कारांची योजना केली आहे. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींना प्रसिद्धीच्या झोतात आणून त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content