HomeArchiveइ-सिगारेटही तितकीच धोकादायक!

इ-सिगारेटही तितकीच धोकादायक!

Details
इ-सिगारेटही तितकीच धोकादायक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. प्रेयस वैद्य, सल्लागार पल्मनॉलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल
धुम्रपानाची सवय सोडण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे आणि खूप त्रास होत असेल तर तुम्ही एकटे नाहीत. १० पैकी सुमारे ७ धूम्रपान करणारे लोक म्हणतात की त्यांना धूम्रपान बंद करायचे आहे. परंतु त्यांना तसे करणे कठीण वाटते. अनेकदा, पारंपरिक सिगारेटवर पर्याय म्हणून लोक इलेक्ट्रॉनिक सिगारेटकडे वळतात. इ-सिगारेट्स ही बॅटरीवर चालणारी धूम्रपानाची उपकरणे आहेत, ज्यात निकोटीन असेल किंवा नसेल. ही इ-सिगारेट्स निकोटिन, प्रॉपेलिन ग्लायकोल आणि ग्लिसरिनयुक्त द्रवपदार्थ गरम करतात आणि त्यातून वाफा येतात. त्याला व्हेपिंग असे म्हटले जाते. ही वाफ सिगारेटपेक्षा कमी धोकादायक असते. परंतु सिगारेटमधील तंबाखूप्रमाणेच त्याचा मानवी शरीरावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो

जॉन हॉपकिन्स मेडिसीनमधील डॉ. मायकेल ब्लाहा म्हणाले की, “वाईट गोष्ट अशी की, अनेकदा तंबाखू उत्पादनापेक्षा जास्त प्रमाणात निकोटीन इ-सिगारेटचे सेवन करणारे लोक घेतात. तसेच तुम्ही जास्त शक्तिशाली कार्टिजेस खरेदी करू शकता. त्यात जास्त प्रमाणात निकोटीन असते किंवा तुम्ही जास्त धुंद होण्यासाठी इ-सिगारेटचे व्होल्टेज वाढवू शकता.”

इ-सिगारेट्स चांगल्या आहेत का?

सिगारेट किंवा इ-सिगारेट्स हे दोन्ही आपल्या अवयवांसाठी सारखेच धोकादायक आहेत. त्यामुळे व्यक्तीच्या एकूणच आरोग्यावर परिणाम होतो. पारंपरिक धूम्रपान आणि इ-सिगारेट्समधील एकमेव फरक म्हणजे दुसऱ्या प्रकारात तंबाखू असू किंवा नसू शकतो. परंतु तंबाखूसारखी इतर अनेक रसायने तुमच्या शरीरात व्हेपिंगद्वारे जातात. अलीकडच्या काळात बाजारात इ-सिगारेट्स ट्रेंडिंग असताना व्हेपिंगही मुख्यत्वे किशोरवयीन तरूणांमध्ये वाढू लागले आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, कूल दिसण्यासाठी किंवा ती निरूपद्रवी असल्याच्या गैरसमजातून किशोरवयीन मुले सिगारेटच्या तुलनेत इ-सिगारेट्सचा वापर करण्याची शक्यता जास्त असते.

व्हेपिंगचा काय नकारात्मक परिणाम होतो?

व्हेपिंगद्वारे निकोटिनचे सेवन व्यसन लावणारे असते. त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यातील काही परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
 मेंदूचा विकास कमी होतो.
 स्मरणशक्तीवर परिणाम करते आणि एकाग्रता कमी करते.
 मूड स्विंग्स आणि अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर होऊ शकतात.
 डोकेदुखीची वारंवारता आणि तीव्रता वाढू शकते.
 फुफ्फुसांना त्रास आणि नुकसान होते.
सतत वापरण्यात आल्यास व्हेपिंगमुळे डिहायड्रेशनही होऊ शकते. अनेकदा नुकसान झालेल्या फुफ्फुसांमुळे झोपण्याच्या पद्धतीतही अडथळे येऊ शकतात. एकूणाच व्हेपिंगमुळे व्यसनाधीनता येऊ शकते आणि त्यावर नंतर उपचार करणे कठीण होते. इ-सिगारेट्समध्ये कर्करोगाला कारण ठरणारी रसायने असतात, जी सिगारेटच्या तुलनेत कमी असली तरी त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच व्हेपिंग थांबवणे इतर कोणत्याही सवयीप्रमाणे कठीण असते. त्याला वेळ लागतो. अनेक दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. कारण व्यसन जीवघेणे ठरू शकते. व्हेपिंग सोडण्याच्या काही टिप्समध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो.

विचार करा

इ सिगारेट्स काहीही करत नाहीत. त्या तुम्हाला आनंद देत नाहीत. त्या तुम्हाला फक्त व्यसनाधीन बनवतात. त्यामुळे, सकारात्मक आणि आरोग्यपूर्ण दृष्टीकोन उपयोगी ठरतो.

सोडण्याबाबत समाधानी राहा

धोकादायक रसायने बंद करण्यास वेळ लागतो. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्यासाठी आतूर व्हावे. शारीरिकदृष्टया सेवन सोडणे सोपे असते. वेदना खूप पटकन कमी होतात. परंतु मानसिक सवयी सोडण्यास खूप वेळ लागतो.

‘फक्त एकच’ म्हणून उपयोग नसतो

फक्त एकदा व्हेपिंग केल्याने कठीण क्षणातून तुम्हाला पुढे जाणे सोपे होईल असा विचार करू नका. त्याऐवजी तुम्ही त्या सापळ्यात पुन्हा अडकाल. पर्याय म्हणजे साखरमुक्त गम चघळणे किंवा पाणी पिणे.

स्वातंत्र्याचा आनंद घ्या

आयुष्य लवकरच सामान्य होईल. तुम्हाला गरज वाटू लागल्यास स्केचिंग किंवा लिहिण्याचा छंद जोपासून स्वतःचे लक्ष दुसरीकडे वळवा. एखाद्या मित्राशी बोला, तुमची आवडती गाणी ऐका किंवा १० खोल श्वास घ्या- मित्राशी बोलल्यानेही तुम्हाला खूप फायदा होईल. खूप प्रयत्न केल्यावरही एखाद्या व्यक्तीला व्हेापिंग सोडणे शक्य न झाल्यास डॉक्ट रांची मदत घ्यात.”
 
“डॉ. प्रेयस वैद्य, सल्लागार पल्मनॉलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content