Details
“‘आय एम धारावी, मेड इन धारावी’!”
01-Jul-2019
”
खा. राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील तीन दिवसीय कार्यक्रम
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लघुद्योगांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या धारावीतील उद्योगधंदे आणि धारावीतील कलाकार यांना एका व्यासपीठावर आणणारा तीन दिवसीय सोहळा आजपासून (22 फेब्रुवारी) धारावीच्या पंपिंग ग्राऊंड येथे सुरू होत आहे. दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पेनेतून साकारलेला हा सोहळा म्हणजे धारावीकरांसह मुंबईकर नागरिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा शुक्रवारी सांयकाळी 6 वाजता मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे.
विविध जाती-धर्मीय नागरिकांची वस्ती असलेली धारावी, ‘मिनी इंडिया’ म्हणून जगभरात ओळखली जाते. या मिनी इंडियाचं मोठेपण अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्यात धारावीतील अनेक नावाजलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. धारावीच्या वस्तीतून आपल्या करियरची सुरूवात करून जगभरात शाबासकी मिळविणाऱ्या कलाकारांचे कलाविष्कार, कव्वाल-ए-नवाझ दानिश यांची कवाली यासह विविध कार्यक्रम इथे सादर केले जाणार आहेत.
रविवारी सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा ‘खेळ मांडीयेला’ हा महिलांसाठीचा खास कार्यक्रम इथे रंगणार आहे. धारावीत उत्पादीत होणाऱ्या चामड्याच्या वस्तू, कुंभारकाम, वस्त्रोद्योग यांसह अनेक उद्योगांचे स्टॉल्स या कार्यक्रमात मांडले जाणार आहेत.”
“खा. राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील तीन दिवसीय कार्यक्रम