Details
आयलव (EyeLuv) एलईडी लाइट्स आरोग्यासाठी उपयुक्त
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
ओरिएंट इलेक्ट्रिक सादर करत आहेत ‘आयलव सीरिज एलईडी लाईट्स’ फ्लिकर कंट्रोल तंत्रज्ञानासहित. सामान्य एलईडी लाईट्समधून निघणाऱ्या अदृश्य मात्र धोकादायक फ्लिकरमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. या नव्या तंत्रज्ञानात हा फ्लिकर कमी करण्यात आला आहे. इंडियन मेडिकल अकॅडमी फॉर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ (आयएमएपीएच)ने ओरिएंट इलेक्ट्रिकच्या या ‘आयलव सीरिज एलईडी लाईट्स’ रेंजची शिफारस केली आहे.
ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड या बहुउद्देशीय 2 अब्ज डॉलर्सच्या सीके बिर्ला ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने ‘आयलव सीरिज एलईडी लाईट्स’ रेंजसह आपल्या एलईडी लायटिंगची उत्पादन यादी अधिक व्यापक केली आहे. आरोग्याच्या विविध तक्रारींना कारणीभूत ठरणाऱ्या इतर एलईडी लाईटमधील अदृश्य मात्र धोकादायक फ्लिकर कमी करण्यासाठी यात फ्लिकर-कंट्रोल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, 30 टक्क्यांहून अधिक फ्लिकर टक्केवारी असणाऱ्या एलईडी लाईट्समधून बाहेर पडणाऱ्या फ्लिकरमधील दीर्घकालीन वावरामुळे डोळे दुखणे, डोकेदुखी, धुसर दृष्टी, ताण, गती मंदावणे किंवा हालचाल बंद होणे, दृष्टीचा वापर असलेल्या कामात परफॉर्मन्स कमी होणे आणि काहीवेळा मेंदूशी संबंधित आजार उद्भवू शकतात.
फ्लिकर म्हणजे एलईडी लाईट्समधील प्रखरतेचे कमीजास्त होणारे प्रमाण. फ्लिकर दोन प्रकारचे असते – दृश्य आणि अदृश्य. दृश्य फ्लिकर डोळ्यांना दिसते आणि यातील फ्रिक्वेन्सी (वारंवारता) साधारणपणे 100 हर्ट्झहून कमी असते. त्यामुळे, या फ्लिकरपासून वाचणे तसे सोपे असते. मात्र, अदृश्य फ्लिकर हा एक असा मुद्दा आहे, जो आपण प्रत्येकानेच गांभीर्याने घ्यायला हवा. मानवी डोळ्यांना दिसू नये इतक्या प्रमाणात, 100 हून अधिक हर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये हे फ्लिकरिंग होते. पण, हे एलईडी फ्लिकर पाहयचे असतील तर एक मार्ग आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात स्लो मोशन व्हिडिओमध्ये साधारण एलईडी लाईटमधील फ्लिकर पाहता येतील. लाईटमधील हे फ्लिकर कधी सौम्य धडधड झाल्यासारखे दिसतात तर कधी दमदार फ्लिकरच्या स्वरूपात.
या सादरीकरणाबद्दल ओरिएंट इलेक्ट्रिक लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश खन्ना म्हणाले की, “ओरिएंट इलेक्ट्रिक नेहमीच नाविन्यता आणण्यात अग्रणी राहिली आहे आणि आयलव सीरिज एलईडी बल्ब्स, बॅटन्स आणि इतर लोकप्रिय एलईडी दिवे सादर केल्याचा आम्हाला आनंद आहे. या दिव्यांमुळे समाजाच्या मोठ्या वर्गाचा लाभ होणार आहे आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या साधारण एलईडी लाईट्समधील अद्श्य फ्लिकरच्या समस्येचीही काळजी घेतली जाणार आहे.”
ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष पुनीत धवन म्हणाले की, “एलईडी लाईटमधील फ्लिकर ही डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारी एक गंभीर बाब आहे. विशेषत: हल्ली आपण कृत्रिम प्रकाशातच अधिक वेळ घालवत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होते. एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळांमध्ये काही संशोधनांच्या माध्यमातून एलईडी लाईट्समधील अदृश्य फ्लिकरचा होणारा परिणाम जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, एलईडी फ्लिकरचे आरोग्यावर अनेक धोकादायक परिणाम होतात आणि एक जबाबदार ब्रँड म्हणून आम्ही या प्रश्नावर उपाय शोधू इच्छितो. या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी आमच्या संशोधन पथकाने वर्षभर मेहनत केली आहे. मला हे सांगताना आनंद होतो आहे की, आमच्या नव्या आयलव सीरिज एलईडी लाईटमधील फ्लिकर-कंट्रोल तंत्रज्ञानामुळे अद्श्य एलईडी फ्लिकर नियंत्रणात राहते आणि त्यामुळे अधिक सुरक्षित आणि एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरते.
ओरिएंट इलेक्ट्रिकच्या फ्लिकर-कंट्रोल तंत्रज्ञान असलेल्या या आयलव सीरिज एलईडी लाईट रेंजला इंडियन मेडिकल अकॅडमी (आयएमए) फॉर प्रीव्हेंटिव्ह हेल्थने मान्यता प्रमाणन दिले आहे. आयलव सीरिज एलईडी लाईट्स अंतर्गत आम्ही सध्या एलईडी बल्ब्स, एलईडी बॅटन, कमर्शिअल लाइट पॅनल्स आणि डाऊनलायटर्स सादर केले आहेत आणि फ्लिकर कंट्रोल तंत्रज्ञान असलेली इतर उत्पादनेही आम्ही आणणार आहोत.”
ओरिएंट इलेक्ट्रिकबाबत
ओरिएंट इलेक्ट्रिक या 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार असलेल्या वैविध्यपूर्ण सीके बिर्ला ग्रुपचा भाग असलेल्या भारतातील ग्राहकोपयोगी विद्युत उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या दमदार उत्पादनक्षमता आणि 40 हून अधिक देशांमध्ये अस्तित्त्व आहे. हा ब्रँड पंखे, घरगुती उपकरणे, लाइटिंग व स्वीचगिअरसह ग्राहक इलेक्ट्रिकल सोल्युशन्सची वैविध्यपूर्ण रेंज ऑफर करतो. ब्रँडची स्थानिक पातळीवरील लहान शहरांमध्येदेखील उपस्थिती असून देशभरात 4000 हून अधिक डीलर्स, 1,25,000 रीटेल आऊटलेटसह वितरण नेटवर्क आहे. तसेच ब्रँडचे 450 हून अधिक शहरांमध्ये प्रबळ सर्विस नेटवर्क आहे. ओरिएंट इलेक्ट्रिकने जीवनशैली इलेक्ट्रिक सोल्युशन्सचा एकथांबा प्रदाता म्हणून बाजारपेठेतील आपले स्थान बळकट केले आहे.
सीके बिर्ला ग्रुपबाबत
सीके बिर्ला ग्रूप हा वेगाने वाढणारा 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्याचा बहुउद्देशीय ग्रुप आहे. जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांसोबत दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा वारसा या समुहाकडे आहे. 25,000 हून अधिक कर्मचारी, 41 उत्पादन केंद्रे, 21 सर्विस डिलिव्हरी स्थळे, असंख्य पेटंट्स, पुरस्कार आणि ग्राहकांचा भक्कम पाया या कंपनीकडे आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये जगातील प्रसिद्ध कंपन्यांचाही समावेश आहे. या समुहाने आपले व्यवसाय जाळे पाच खंडांमध्ये पसरवले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो