HomeArchiveअसांजे: महाजालातील चोर...

असांजे: महाजालातील चोर की साव?

Details
असांजे: महाजालातील चोर की साव?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
ज्युलिअस असांजे हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक. इंग्लंडमध्ये गेला व तिथे असणाऱ्या इक्वाडोरच्या दूतावासात त्याने राजाश्रय घेतला. हे असे कसे होऊ शकेल, असे आपल्याला वाटते. पण हा परिणाम आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, शक्तीशाली सरकारांना दुखवल्याचा आणि स्वातंत्र्याच्या नावावर केलेल्या बेकायदा कृत्यांचाही! असांजे हा संगणक युगाच्या नव्या माहितीचा मसीहा की जगविख्यात चोर? तो देशद्रोही आणि विविध राष्ट्रांचा गुन्हेगार आहे की जगातील सर्व जनतेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊ पाहणारा माहिती महाजालातील एक योद्धा? तो चोर हे की साव? असे सारे प्रश्न असांजेच्या कहाणीशी निगडीत आहेत.

संगणकाचा विकासातून व माहितीच्या महाजालाच्या विस्तारातून नवे व्यवसाय जन्मले. हॅकिंग व कॉम्प्युटर प्रोग्रामर हे त्यातील दोन नमुने. असांजे हा या दोन्हींचा मास्टर होता. संगणक प्रणालींमध्ये परक्या व्यक्तीला माहिती मिळवता येऊ नये यासाठी जी सुरक्षाप्रणाली वापरली जाते तो अर्थातच एक सॉफ्टवेअरचाच एक प्रकार असतो. या सॉफ्टवेअरच्या कड्याकुलुपात दडवलेली माहिती महाजालाच्याच मदतीने तोडण्याचे, उघडण्याचे काम हॅकर ही जमात करत असते. ते संगणक शास्त्रातले आणि सॉफ्टवेअरमधले किडे असतात. असांजे हा असाच एक किडा होता. मूळचा मेलबर्नचा (ऑस्ट्रेलिया) रहिवासी असणाऱ्या असांजेने जगभर चारही खंडात प्रवास केला. नाव व बद-नावही कमावले. सारीच सरकारे तुमच्यावर नजर ठेवून असतात, तुमचे व्यक्तीस्वातंत्र्य दररोज संकोचत असते, तेव्हा जगाच्या नागरिकांना एक मोकळेपणा, विचाराचे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी धारणा असणाऱ्या मंडळींचा तो म्होरक्या बनला. हॅकिंग विषयातील तो जगमान्य लेखक संशोधक होता. सर्वंकष स्वातंत्र्याचा पुरस्कार म्हणजे राष्ट्र नावाच्या व्यवस्थेचा बीमोड हे त्याचे तत्वज्ञान त्याने बनवले. जगातील कोणत्याही देशाच्या सरकारांनी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला घातला तर तो मोडून, तोडून टाकला पाहिजे असा त्याचा प्रयत्न होता. त्यातूनच विकिलीक्स या वेब दुनियेचा तो जन्मदाता ठरला.

वॉर्ड कनिंगहॅम या कॉम्प्युटर प्रोग्रामरने विकी-विकी-वर्ड या वेब पोर्टलची सुरूवात केली. हवाई बेटावरील विकी या शब्दाचा अर्थ आहे वेगवान. माहितीची जलद देवाणघेवाण हा विकीचा मूळ उद्द्येश असतो. विकीपिडीया या ज्ञानकोषात वाचणारे, वापरणारे सारेच भर घालू शकतात. असांजेने जेंव्हा विकीलीक्सची सुरूवात 2006 मध्ये केली तेव्हा त्याच्या डोळ्यापुडे विकीपीडिया ज्ञानकोषाचे उदाहरण होते. या विकीलीक्समध्ये जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून लोक नवी माहिती टाकतील व जुन्या माहितीमध्ये हवा तसा फेरबदल करतील अशी व्यवस्था त्याला तयार करायची होती. पण तो ढांचा व्यवहार्य नव्हता. कारण त्याला हल्ला मोठ्या यंत्रणांवर करायचा होता. त्यामुळे नाव जरी विकी पठडीचे राहिले तरी त्या पोर्टलचे संपादन ठराविकच लोक करतात. बाकी वापरकर्ते फक्त ती माहिती पाहू शकतात, ती डाऊनलोडही करू शकतात. या त्याच्या अपत्याने 2006 ते 2010 पर्यंत गुप्त व स्फोटक माहितीचे अनेक बार उडवले.

अफगाण, इराण युद्धांवरील त्याचे गौप्यस्फोट जगाला हादरवणारे ठरले. अमेरिका व पाश्चात्य देशांच्या राजदूतांनी मायदेशी पाठवलेल्या तारा, पत्रे व ईमेल त्याने उघड केले. त्यासाठी शोध पत्रकारितेचे अनेक पुरस्कारही असांजेला मिळाले. अगदी टाईम मासिकाचा वाचकांच्या दृष्टीने मॅन ऑफ दी इयर बनण्याचाही मान त्याला 2010 मध्ये मिळाला. त्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अनेक राष्ट्रांच्या यंत्रणांची झोप उडवली. अफगाण पेपर्स या सदराखाली त्यांनी तब्बल 91 हजार कागदपत्रे जगासमोर आणली. त्यात एक व्हिडिओ प्रचंड गाजला. जगाला अस्वस्थ करून गेला. काही अमेरिकन सैनिक निरपराध व निशस्त्र अशा 18 अफगाण नागरिकांना ठार मारतात असा तो व्हिडिओ कोलॅटरन मर्डर या शिर्षकाखाली विकीलीक्सने प्रसिद्ध केला. त्याने अमेरिकन जनता व सरकारही हादरले होते. तो व्हिडिओ अमेरिकन लष्कराच्याच लोकांनी चित्रित केला होता. ही सारी अमेरिकन लष्कराची गुप्त माहिती असांजेला चेलसी मॅनिंग या अमेरिकन लष्करी जवानाने दिली. चेलसीचे अमेरिकने कोर्टमार्शल केले. तिला सजाही झाली. जी काही माहिती असांजे व त्याच्या टीमच्या हातात लागत होती ती तो बिनधास्तपणाने जगापुढे उघड करत होता. त्याचे विकीलीक्स हे वेबसाईट पोर्टल चांगलेच लोकप्रिय झाले.

ज्या व्यक्ती स्वातंत्र्याचे अतिरेकी पुरस्कर्ते असतात व ज्या संस्था विविध देशांच्या केंद्र सरकारांनी केलेल्या कृष्णकृत्यांचा निषेध करत असतात असा सर्वांनीच असांजेला डोक्यावर घेतले. पण अमेरिकन तपासयंत्रणांनी 2010 पासून त्याचा पिच्छा पुरवण्यास सुरूवात केली. त्याला पकडून देशाचा गुन्हेगार म्हणून न्यायासनासमोर उभे करण्याचे एफबीआयने ठरवले आहे. 2010 च्या जुलैमध्ये असांजे स्वीडनमध्ये सेमिनारसाठी गेला असताना विनयभंग व बलात्कारही केल्याची तक्रार दोन महिलांनी केली. त्याला तिथे अटक झाली. पण नंतर सोडूनही देण्यात आले. तो लंडनला येऊन राहिला. हा गुन्हा त्याने अमेरिकन यंत्रणांशी पंगा घेण्याआधीचा होता आणि त्याला पकडून अमेरिकेत नेण्यासाठी त्याचा आधार २०१० नंतर घेतला जाऊ लागला. त्याला लंडनहून पकडून स्वीडनमध्ये खटल्याला सोमोरे जाण्यासाठी आणण्याचे ठरले. 2012 मध्ये स्वीडनमधील कथित बलात्कार प्रकरणात त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. पण दोन दिवसातच तो जामिनावर सुटला.

त्याने ब्रिटिनमधून बाहेर पडून अन्य देशात लपता येते का याचा शोध सुरू केला होता. अमेरिकचे सरकार त्याला स्वीडन वा इंग्लंडमधून सहज प्रत्यार्पणाच्या कराराच्या आधारे पकडून नेईल ही साधार भीती त्याला होती. इक्वाडोर हा एक दक्षिण अमेरिकेतील छोटा देश आहे. तिथे खरेतर अमेरिकेबरोबर होणारा व्यापार हे उत्पन्नाचे एक मोठे साधन आहे. पण तिथे २००७ ते २०१७ पर्यंत अमेरिकेला कडवा विरोध करणारे अध्यक्ष व्हिन्सेंट कोरिया यांची सत्ता होती. त्यांनी असांजेला २०१२ च्या जुलैमध्येच लंडनमधील इक्वाडोर राजदूतावासामध्ये आसरा दिला. राजकीय राजाश्रय देऊन त्याला इक्वाडोरला आणता येईल अशी त्यांची अटकळ होती. पण विमानताळाकडे जण्यासाठी तो दूतावासातून बाहेर पडला की लगेचच त्याला अटक होईल हे स्पष्ट झाले. बाहेर ब्रिटिश पोलिसांनी कडक पहारा ठेवला होता. असांजे दूतावासामधून बाहेर येऊ शकत नव्हता. तो तिथेच अडकून पडला. त्याच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची, औषधांची व इंटरनेटची सारी सुविधा राष्ट्राध्यक्ष कोरिया यांच्या आदेशाने मिळत होती. पण २०१५ पासून फासे उलटे पडू लागले. असांजे व विकीलीक्सचे आंतरराष्ट्रीय व अमेरिकाविरोधी कारनामे वाढू लागले तसे इक्वाडोरचे स्ताधारीही सावध झाले.

स्नोडेन प्रकरण व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील हिलरी क्लिंटन यांच्या विरोधातील विकीलीक्सची कृती यामुळे असांजेचे दिवस भरले. स्नोडेन हा सीआयएचा कॉम्प्युटर प्रोग्रामर होता. अमेरिकन नागरिकांचीच हेरगिरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय करते अशाप्रकारची असंख्य गुप्त कागदपत्रे त्याने चोरली व ती सारी विकीलीक्सच्या माध्यमातून जगापुढे आणली. अशाप्रकारे तो असांजेशी जोडला गेला व असांजेवरची अमेरिकेची वक्रदृष्टी आणखी कडक झाली. या स्नोडेनला अमेरिकेतून बाहेर काढण्याची आंतरराष्टरीय झोलबाजी असांजेने लंडनच्या दूतावासात बसून घडवली असे दिसून आले. हा स्नोडेन थेट रशियात जाऊन राहिला आहे. २०१६ च्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये असांजेच्या विकीलीक्सने हिलरी क्लिंटन यांचे असंख्य इमेल जगापुढे आणले. तेव्हा मग इक्वाडोरने असांजेचे इंटरनेट कनेक्शनच बंद करून टाकले. २०१७ मध्ये इक्वाडोरमध्ये सत्तापालट झाल्यानंतर तर असांजेचे नशीबच फिरले. राजाश्रय मिळवताना जी वचने असांजेने दिली त्यांचा भंग झाल्याचे जाहीर करून इक्वाडोरचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष लेनीन मोरेनो यांनी असांजेला लंडनमधील दूतावासातून बाहेर पडावे लागेल हे स्पष्ट केले होते. इक्वाडोरने त्याचा राजाश्रय रद्द केल्यानंतर आता लंडन पोलिसांनी त्याला अटक केली असून लवकरच त्याला अमेरिकेत पाठवले जाईल हे स्पष्ट झाले आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content