Details
अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांची गतीने अंमलबजावणी करा – हाजी अरफात शेख
30-Jun-2019
”
अल्पसंख्याक समाजासाठीच्या विविध योजना त्या-त्या लाभार्थीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात अल्पसंख्याक
समाजासाठीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारशी आणि जैन या समाजांचा समावेश असून या समाजातील तरूण-तरूणींना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्यासही सर्व यंत्रणांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन करून हाजी अरफात शेख म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठी कौशल्य विकासाच्या दृष्टिनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकचे रोजगार मेळावे घेण्याबरोबरच तरूणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यावरही भर द्यावा.
अल्पसंख्यांक समाजातील तरूणांना विविध व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मौलाना आझाद महामंडळाला गती दिली असून शासनाने या महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद केली आहे. या महामंडळामार्फत अन्य मोठ्या उद्योग व्यवसायासाबरोबरच रिक्षा, टॅक्सी, टेंम्पो अशा छोट्या-मोठ्या उद्योगासाठीही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.”
“अल्पसंख्याक समाजासाठीच्या विविध योजना त्या-त्या लाभार्थीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात अल्पसंख्याक