HomeArchiveअलक!

अलक!

Details
अलक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा
[email protected]

अलक म्हणजे अति लघु कथा.. अलिकडेच विकसीत झालेला हा साहित्य प्रकार..

गाव राहालं पायजेल!

गावातलं एकमेव पटांगण.. भर उन्हात तिथे धुरळा उडवित गाड्या थांबत होत्या. कच्ची-बच्ची, त्या धुरळ्यातच गाड्यांमागं धावत आलेली. भपकेबाज गाडीतून ऐटबाज माणसं उतरली. दोन गॉगलधारी महिला. दुसरी गाडी सामानाची.. दोन्हीवर फलक, ‘आपल्या सेवेसाठी’! सामानगाडीतून बॉक्स निघाली. सायब, सायबिणींनी रांग धरलेल्या पोरांना कापडं वाटली. मोबाइलातून फोटो निघाले. धुरळा उडवत गाड्या निघाल्या. बाजूच्या टपरीतला तो पुटपुटला.. यांची जुनी कापडं संपावित म्हणून तरी गाव राहालं पायजेल!

लिफ्ट येईपर्यंत..

पुनर्विकासात उभ्या राहिलेल्या गगनचुंबी मनोऱ्यात त्यांचे फ्लॅट लिफ्टपासून विरूद्ध दिशेस होते. एकदा लिफ्टमध्येच स्मित व गुडमॉर्निंगची देवाणघेवाण झाली. फार दिवसांनी संवाद पुढे गेला. ‘गाठभेट नाही? हो, अॅब्रॉडला एक अंकल होते, ते गेले!’
‘काही दिवसांनी उलटउजळणी झाली. स्टेट्समध्ये आन्टी होती, गेली., जावंच लागलं!’ वर्ष जात राहिली.. लिफ्ट येईपर्यंत व थांबेपर्यंत संवाद होत राहिला.

पेंशन..

बॅंकेचा मेसेज पाहून माई कावऱ्याबावऱ्या झाल्या. पेन्शन अपेक्षित होती, तिथे मेसेज दोन हजार अन् चारशे तेवीस म्हणतो. पेन्शन कमी कशी झाली? हाताला कंप आणि पाय थरथरू लागले. माईंनी मेसेज दादांना दाखविला.
‘अगं हा, आपला फ्लॅट कर्जहप्त्याचा आकडा!’ कर्ज फिटून तर वर्षं उलटली, तरी?
‘दोघांच्या छातीत धडधड सुरू झाली. इतक्या वर्षांची स्थिर सावली सरकन् सरकली. सुन्नावस्थेत ते पेन्शनची चौकशी विसरून गेले.

तिघं कटाप..

चौघांना जीएन् फॉरवर्ड करून त्याने मोबाईल बाजूस सारला. गॅलरीत शतपावली उरकली. व्हाट्सअॅप पाहिलं. एकाच्याही उलट शुभेच्छा नव्हत्या. तो चरफड, चरफडला. अस्वस्थतेत पुन्हा पुन्हा पाहत राहिला. ते चौघंही गप्प होते. मध्ये जाण्यासाठी.. उठल्यावरही दोनदा व्हाट्सअॅप चेक केलं. चारांत एकाने म्हटलं होतं शुभरात्री! ‘तो अंधारातच हसला. एकाला तरी माणुसकी आहे. सकाळी यानांच जीएम करतो.. बाकी तिघं कटाप!
समाधानाने तो पलंगावर पहुडला.
झोपेचं सोंग केलेली सौ. ती अस्वस्थ चलबिचल पाहून अस्फूट हसली.

तो देखणा अपटुडेट..

बसमध्ये देखण्या अपटुडेट सहप्रवाशाकडे तो पाहत होता. त्याचं बसणं, हातातील मोबाइलकडे एकचित्त पाहणं चिताकर्षकच होतं.
एसी जरा जास्तच आहे ना? त्यानं स्मित केलं. मोबाइलमध्ये कळ दाबली. उबदार वाटू लागलं.
उत्सुकतेपोटी पुन्हा छेडलं. ‘शर्ट छानंच आहे, थोडा पिंक असता तर!’
एकचित्ताने पुन्हा फक्त कळ दाबली. शर्टमध्ये गुलाबी छटा प्रकटल्या. आश्चर्यात सोडून तो निघाला.
स्टॉप येत असावा. मी यंत्रमानव आहे. कर्म करणं आवडतं, व्यर्थ बोलणं नाही!’
तो उतरून गेला. पुन्हा गार वाटू लागलं..”
 
“सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content