HomeArchiveअलक.. अति लघु...

अलक.. अति लघु कथा!

Details
अलक.. अति लघु कथा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा
[email protected]
ज्या विषयावर सहज दोन ते चार पानी कथा होऊ शकते. तोच आशय नेमक्या निवडक शब्दांत व्यक्त होतो ते अति लघु कथा म्हणजेच अलक..

दाण्याची पुडी

दाणेवाल्याकडून दाण्याची पुडी खिशात कोंबीत गडबडीत गाडी पकडली. गाडीत गर्दी नव्हती हे आश्चर्यच. आसनावर बसलो.. एक शेंगदाणा तोंडात टाकला. डावीकडच्या आसनावर एकटाच बसलेलं ते जुनाट कपड्यातलं ते काळसर पोर एकटक पुडीकडे पाहत होतं. डोईवर कशीतरीच मातकट टोपी. ते बोट दाखवत होतं.
तुला पाहिजे?
त्याने कसासाच उच्चार केला होकारार्थी.
ही घे!
आश्चर्य..
आनंदात डोळे विस्फारत तो मुका मुलगा विचित्रसा आवाज करीत चित्कारला. पुडी हिसकावत तो दाणे खाऊ लागला..
त्याचं सुख त्याला सापडलं होतं.. जणू सारी श्रीमंती त्या पुडीत होती.

मनमंदिर

नखशखान्त पिठाने माखलेला तो म्हणत होता.. पिशवीवर फक्त श्री लिहीलत, त्याचा अर्थ काय?
म्हटलं त्याचा अर्थ सत्य, शिव आणि शुभ, म्हणजेच ईश्वर!
त्याचा प्रश्नः तो कोण, कोठे असतो?
त्याच्या बोलण्यात आता मला रस निर्माण झालेला.. उत्तर दिलं.. तो सर्वत्र आहे, सर्वांचा आहे, एकच आहे!
तेव्हा पिठाने माखलेले हात आणि मान हलवून तो सहज म्हणाला.. इतकंच नाही काही, तो स्वच:च निर्माण केलेल्या मंदिरात राहतो.. मनमंदिरात!

मुंगीदंश

जुनाट कॉटवर तो लहान मुलगा प्रौढ माणसाच्या जवळ झोपलेला. कुशीत काही चावत होतं. अनेकदा झटकूनही.. पुन्हा तेच. रडत डोळे चोळत तो उंबऱ्यात केस विंचरीत बसलेल्या आई-बहिणीला म्हणाला.. तिथे मुंगी चावते.
त्यांनी परत झोपायला पाठविलं..
पुन्हा बारीक मुंगी चावत राहिली..
पुन्हा उंबऱ्यावर तक्रार.. कॉटवर रवानगी.. मुंगीदंश..
नंतर खूप वर्षांनी तो प्रसंग आठवला.. अन् क्षणात मुंगीदंश रहस्य उलगडलं. ते मुंगीदंश नव्हते.. तो माणूस त्याला कोचत होता.

त्याच्या फळीवर..

एसटी कॅन्टीनमध्ये बाजूच्या टेबलावरच्या गांधी टोपीवरून रूमाल गुंडाळलेल्या दादांना नमस्कार केला.
गाव कोण?
मुंबई! आपलं?
तुळजापूरशेजारी.
साहित्य संमेलनाला आलो होतो. कवनं करतो ना, शेतात राबताना.
इथं कुठं थांबले?
एक दुकानवाला वळखीचा आहे.. त्याच्या फळीवर, दादा हसून सहज म्हणाले.

उद्ध्वस्ततेच्या कड्याकडे..

साहित्य संमेलन आटोपून मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस पकडली..
आसपास गप्पांत रंगलेला प्रौढांचा गट.. सगळे उच्चशिक्षीत होते.. हास्यविनोदात दंग.. तरी काही चुकतंय असं जाणवत राहीलं..
गाढ झोपलो..
सकाळी हास्यविनोदानेच जाग आली.. पुन्हा तीच भावना झाली.. काहीतरी चुकतंय.. हास्य आणि विनोदाच्या विषयांत विसंगती आहे..
प्रतीक्षा संपली..
एक एक जण एकाच सहप्रवाशासमोर बसू लागला.
कान टवकारले..
कसं वाटलं दौऱ्यात आणि चर्चासत्रात, काय सांगाल?
छान वाटलं.. समरस झालो. खंत वाटतेय.. पत्नी सोडून गेलीय.. तिने परत यावे!
पुढे इतरांचंही ऐकत राहिलो.. ऐकत राहिलो..
रात्रीच जाणवलेल्या विसंगतीचा उलगडा झाला. ते सर्व व्यसनाधीनतेपायी उद्ध्वस्तेच्या कड्यापर्यंत गेलेले होते.. पुन्हा जीवनाकडे परतण्याची पराकाष्ठा करण्यासाठी..”
 
“सदानंद खोपकर, संपादक, साप्ताहिक मावळमराठा

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content