HomeArchiveअमेरिकन इतिहासातील वेदनादायी...

अमेरिकन इतिहासातील वेदनादायी प्रकरण : गुलामगिरी

Details
अमेरिकन इतिहासातील वेदनादायी प्रकरण : गुलामगिरी

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
अनिकेत जोशी
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com 
आपण भारतीय वर्णव्यवस्थेचे गुलाम ठरलो तरी प्रत्यक्षात माणसांची खरेदीविक्री केल्याचा डाग भारतीय व्यवस्थेवर नही. तो अमेरिकेवर आहे. कोलंबससह अनेक युरोपीय योद्ध्यांनी अमेरिकेची स्थापना चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी केली. पण तिथे विविध तऱ्हेचे संघर्ष अनेक शतके सुरू होते. स्थानिक आद्यरहिवासी रेड इंडिययन्सविरोधात युरोपीय गोरे वसाहतवादी लढत होते. काही दशकांनंतर आफ्रिकेमधून पळवून आणलेल्या स्त्री-पुरुष आणि मुलांना साखळदंडांनी बांधून आणले जाऊ लागले. बोटी भरभरून अमेरिकेत आणलेले हे गुलाम अक्षरशः नरकयातानांत जगले. युएसए म्हणजेच अमेरिकेत सर्वत्रच गुलामगिरीची प्रथा होती. पण, देशाच्या दक्षिण भागातील राज्यांमध्ये अधिक काळ रूढ होती. तिथे असणाऱ्या मोठमोठ्या मळ्यांमध्ये शेती करण्याच्या कामी या गुलामांना जुंपले जात होते.
 
 
या आफ्रिकन वंशाच्या काळ्या अमेरिकन लोकांचा फार मोठा संघर्षाचा इतिहास आहे. पण अमेरिकन शिक्षणव्यवस्थेने ते सत्य आजवर कधीच स्पष्टपणाने व धीटपणाने मांडले नव्हते. आता गेल्या काही वर्षांत काही शाळांमधून अमेरिकन इतिहासातील या साऱ्या लाजिरवाण्या प्रकरणांवरही भाष्य केले जाऊ लागले आहे. स्वतःच्या चुका स्वीकारूनच समाज पुढे जाऊ शकतो, असा सिद्धांत काही शिक्षणतज्ज्ञांनी मांडला असून त्यावर काही शाळांमधून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अमेरिकेतील आघाडीच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने यासंदर्भात एक तपशीलवार अभ्यास केला. त्याआधारे या पत्राने लेखमालिका प्रकाशित केली आहे.
 
 
वॉशिंग्टन पोस्टच्या अभ्यासकांनी विविध शहरांतील अनेक माध्यमिक शाळांना भेटी दिल्या. शेकडो विद्यार्थी, शिक्षक व इतिहासतज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्या आणि निष्कर्ष असा काढला की, अमेरिकेचा जो इतिहास सच्चेपणाने मुलांपुढे पूर्वी मांडला जात नव्हता, ती सुरूवात आता काही शाळांमधून झाली आहे. आठवीतील मुलांना इतिहास शिकवणाऱ्या टॉम मॅकलीमोन या तरूण शिक्षकाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या स्थापनेपासूनच्या २४६ वर्षांमध्ये गुलामगिरीला समाजाची व कायद्याची अधिकृत मान्यता होती. गुलामांचे बाजार रीतसर भरवले जात होते. साखळदंडांनी बांधून मुलांना, स्त्रियांना व पुरूषांना या बाजारात आणले जात होते. बोटी भरून या मंडळींना आफ्रिका खंडामधील गावातून पळवून, साखळदंडांनी बांधून बोटींमध्ये भरून अमेरिकेत आणले जात होते. घरकामांसाठी, मजुरीसाठी व शेतात राबवण्यासाठी या गुलांमांना विकत घेतले जात होते. हे सारे भीषण वास्तव आठवीतील मुलांना शिकवताना मी सांगतो की, गेल्या १५४ वर्षांत कायद्याने गुलामगिरीची प्रथा आपण नष्ट केली. पण, त्याहून शतकभर अधिक काळ गुलामगिरी कायदेशीर होती, हे वास्तव आहे.
 
 
मुलांनाही या माहितीमुळे धक्का बसतो. त्याआधी शाळेत त्यांच्यापुढे या गोष्टी इतक्या स्पष्टपणाने आणि इतक्या नेमक्या पद्धतीने मांडल्याच गेल्या नव्हत्या. अमेरिकेत गेल्या पाच-सात वर्षांत काळे विरूद्ध गोरे असा एक नवा राजकीय संघर्ष पुढे येत असताना गोऱ्यांनी काळ्यांच्या पूर्वजांवर केलेल्या अनन्वित अत्याचाराच्या इतिहासाची पाने उलगडण्याची प्रेरणा काही शिक्षकांना मिळाली हे विशेष.
 
 
अनेक शिक्षकांची हा काळा क्लेषदायक इतिहास शिकवण्याची तयारी आहे खरी. पण, बहुतेक साऱ्या इतिहासाच्या शालेय पुस्तकांमध्ये या प्रकरणावर तपशिलात भाष्य केले जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तिथे असे लिहिलेले असते की, काही कामगारांना आफ्रिकेतून अमेरिकेत आणले गेले तेच आजच्या निग्रो वा कृष्णवर्णियांचे पूर्वज आहेत. बस्स, इतकेच! पण हा खरा इतिहास नाही. खरा इतिहास काही पिढ्यांपासून लपवला गेला, तो आता नव्या पिढीसमोर स्पष्टपणाने व सच्चेपणाने मांडला जातो आहे, असे हे शिक्षक अभिमानाने सांगतात.
 
 
हा इतिहास नीट मांडला गेला तर विद्यमान काळातील असमतोल व अन्याय दूर करता येईल असा विश्वास या मंडळींना वाटतो. तुरूंगात जाणाऱ्या काळ्या तरूणांचे प्रमाण गोऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक असते. पोलीस काळ्या-गोऱ्या दोघांनाही एकाच प्रकारच्या गुन्ह्यांत जरी पकडलेले असले तरी न्यायाधीशांचा कल काळ्या व्यक्तीला तुरूंगात पाठवण्याकडे अधिक आहे, असेही निरीक्षण काहींनी नोंदवले आहे. इतिहासाच्या नीट परिशीलनाने ही वृत्ती कमी होऊ शकेल, असे त्यांना वाटते. जर गुलामगिरीचा काळा इतिहास माहिती असेल तर अमेरिकन घटनेमध्ये प्रथम असणारे, “सर्व माणसे जन्मतः समानच आहेत” हे तत्त्व अधिक प्रकर्षाने पटते, महत्त्वाचे ठरते, असे या मंडळींचे सांगणे आहे व म्हणूनच अमेरिकेतील पाच कोटी शाळकरी मुलामुलींना अमेरिकन इतिहासातली क्लेषदायी गुलामगिरीचे प्रकरण नीट सांगावे, हा प्रयत्न सुरू झाला आहे.”

 
 

 
 
अनिकेत जोशी
“संपादक, बित्तंबातमी”
aniketsjoshi@hotmail.com 

“आपण भारतीय वर्णव्यवस्थेचे गुलाम ठरलो तरी प्रत्यक्षात माणसांची खरेदीविक्री केल्याचा डाग भारतीय व्यवस्थेवर नही. तो अमेरिकेवर आहे. कोलंबससह अनेक युरोपीय योद्ध्यांनी अमेरिकेची स्थापना चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी केली. पण तिथे विविध तऱ्हेचे संघर्ष अनेक शतके सुरू होते. स्थानिक आद्यरहिवासी रेड इंडिययन्सविरोधात युरोपीय गोरे वसाहतवादी लढत होते. काही दशकांनंतर आफ्रिकेमधून पळवून आणलेल्या स्त्री-पुरुष आणि मुलांना साखळदंडांनी बांधून आणले जाऊ लागले. बोटी भरभरून अमेरिकेत आणलेले हे गुलाम अक्षरशः नरकयातानांत जगले. युएसए म्हणजेच अमेरिकेत सर्वत्रच गुलामगिरीची प्रथा होती. पण, देशाच्या दक्षिण भागातील राज्यांमध्ये अधिक काळ रूढ होती. तिथे असणाऱ्या मोठमोठ्या मळ्यांमध्ये शेती करण्याच्या कामी या गुलामांना जुंपले जात होते.”
 
 
“या आफ्रिकन वंशाच्या काळ्या अमेरिकन लोकांचा फार मोठा संघर्षाचा इतिहास आहे. पण अमेरिकन शिक्षणव्यवस्थेने ते सत्य आजवर कधीच स्पष्टपणाने व धीटपणाने मांडले नव्हते. आता गेल्या काही वर्षांत काही शाळांमधून अमेरिकन इतिहासातील या साऱ्या लाजिरवाण्या प्रकरणांवरही भाष्य केले जाऊ लागले आहे. स्वतःच्या चुका स्वीकारूनच समाज पुढे जाऊ शकतो, असा सिद्धांत काही शिक्षणतज्ज्ञांनी मांडला असून त्यावर काही शाळांमधून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अमेरिकेतील आघाडीच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने यासंदर्भात एक तपशीलवार अभ्यास केला. त्याआधारे या पत्राने लेखमालिका प्रकाशित केली आहे.”
 
 
“वॉशिंग्टन पोस्टच्या अभ्यासकांनी विविध शहरांतील अनेक माध्यमिक शाळांना भेटी दिल्या. शेकडो विद्यार्थी, शिक्षक व इतिहासतज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्या आणि निष्कर्ष असा काढला की, अमेरिकेचा जो इतिहास सच्चेपणाने मुलांपुढे पूर्वी मांडला जात नव्हता, ती सुरूवात आता काही शाळांमधून झाली आहे. आठवीतील मुलांना इतिहास शिकवणाऱ्या टॉम मॅकलीमोन या तरूण शिक्षकाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या स्थापनेपासूनच्या २४६ वर्षांमध्ये गुलामगिरीला समाजाची व कायद्याची अधिकृत मान्यता होती. गुलामांचे बाजार रीतसर भरवले जात होते. साखळदंडांनी बांधून मुलांना, स्त्रियांना व पुरूषांना या बाजारात आणले जात होते. बोटी भरून या मंडळींना आफ्रिका खंडामधील गावातून पळवून, साखळदंडांनी बांधून बोटींमध्ये भरून अमेरिकेत आणले जात होते. घरकामांसाठी, मजुरीसाठी व शेतात राबवण्यासाठी या गुलांमांना विकत घेतले जात होते. हे सारे भीषण वास्तव आठवीतील मुलांना शिकवताना मी सांगतो की, गेल्या १५४ वर्षांत कायद्याने गुलामगिरीची प्रथा आपण नष्ट केली. पण, त्याहून शतकभर अधिक काळ गुलामगिरी कायदेशीर होती, हे वास्तव आहे.”
 
 
मुलांनाही या माहितीमुळे धक्का बसतो. त्याआधी शाळेत त्यांच्यापुढे या गोष्टी इतक्या स्पष्टपणाने आणि इतक्या नेमक्या पद्धतीने मांडल्याच गेल्या नव्हत्या. अमेरिकेत गेल्या पाच-सात वर्षांत काळे विरूद्ध गोरे असा एक नवा राजकीय संघर्ष पुढे येत असताना गोऱ्यांनी काळ्यांच्या पूर्वजांवर केलेल्या अनन्वित अत्याचाराच्या इतिहासाची पाने उलगडण्याची प्रेरणा काही शिक्षकांना मिळाली हे विशेष.
 
 
“अनेक शिक्षकांची हा काळा क्लेषदायक इतिहास शिकवण्याची तयारी आहे खरी. पण, बहुतेक साऱ्या इतिहासाच्या शालेय पुस्तकांमध्ये या प्रकरणावर तपशिलात भाष्य केले जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तिथे असे लिहिलेले असते की, काही कामगारांना आफ्रिकेतून अमेरिकेत आणले गेले तेच आजच्या निग्रो वा कृष्णवर्णियांचे पूर्वज आहेत. बस्स, इतकेच! पण हा खरा इतिहास नाही. खरा इतिहास काही पिढ्यांपासून लपवला गेला, तो आता नव्या पिढीसमोर स्पष्टपणाने व सच्चेपणाने मांडला जातो आहे, असे हे शिक्षक अभिमानाने सांगतात.”
 
 
“हा इतिहास नीट मांडला गेला तर विद्यमान काळातील असमतोल व अन्याय दूर करता येईल असा विश्वास या मंडळींना वाटतो. तुरूंगात जाणाऱ्या काळ्या तरूणांचे प्रमाण गोऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक असते. पोलीस काळ्या-गोऱ्या दोघांनाही एकाच प्रकारच्या गुन्ह्यांत जरी पकडलेले असले तरी न्यायाधीशांचा कल काळ्या व्यक्तीला तुरूंगात पाठवण्याकडे अधिक आहे, असेही निरीक्षण काहींनी नोंदवले आहे. इतिहासाच्या नीट परिशीलनाने ही वृत्ती कमी होऊ शकेल, असे त्यांना वाटते. जर गुलामगिरीचा काळा इतिहास माहिती असेल तर अमेरिकन घटनेमध्ये प्रथम असणारे, “सर्व माणसे जन्मतः समानच आहेत” हे तत्त्व अधिक प्रकर्षाने पटते, महत्त्वाचे ठरते, असे या मंडळींचे सांगणे आहे व म्हणूनच अमेरिकेतील पाच कोटी शाळकरी मुलामुलींना अमेरिकन इतिहासातली क्लेषदायी गुलामगिरीचे प्रकरण नीट सांगावे, हा प्रयत्न सुरू झाला आहे.”

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content