Details
अतुल भातखळकर यांना पुन्हा भाजपाचे तिकीट
03-Oct-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल कांदिवली पूर्वचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी पक्ष नेतृत्त्वाचे आभार व्यक्त केले.
भाजपाच्या पहिल्या यादीत आमदार अतुल भातखळकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला. माझ्यावर विश्वास दाखवत मला विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. पुन्हा एकदा कांदिवली पूर्वतील जनतेची सेवा करण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गेल्या पाच वर्षांत आमदार म्हणून मी जनतेची पूर्ण क्षमतेने सेवा केली. पुन्हा निवडून येऊन कांदिवली पूर्व विधानसभेला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी ताकदीने प्रयत्न करेन एवढेच यावेळी मी सांगू इच्छितो, असेही त्यांनी सांगितले. भातखळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कांदिवली पूर्व विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची त्यांच्या कार्यालयात गर्दी झाली.”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल कांदिवली पूर्वचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी पक्ष नेतृत्त्वाचे आभार व्यक्त केले.
“भाजपाच्या पहिल्या यादीत आमदार अतुल भातखळकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला. माझ्यावर विश्वास दाखवत मला विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. पुन्हा एकदा कांदिवली पूर्वतील जनतेची सेवा करण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.”
“गेल्या पाच वर्षांत आमदार म्हणून मी जनतेची पूर्ण क्षमतेने सेवा केली. पुन्हा निवडून येऊन कांदिवली पूर्व विधानसभेला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी ताकदीने प्रयत्न करेन एवढेच यावेळी मी सांगू इच्छितो, असेही त्यांनी सांगितले. भातखळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कांदिवली पूर्व विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची त्यांच्या कार्यालयात गर्दी झाली.”
भारतीय जनता पक्षविधानसभा निवडणुकअतुल भातखळकरपंतप्रधान नरेंद्र मोदीगृहमंत्री अमित शाहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलकांदिवली