Details
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज दीक्षांत समारंभ
31-Aug-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस आणि दीक्षांत समारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या मेयर हॉल, स्थानिकराज भवन, सी. डी. बर्फीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजीतसिंह गायकवाड उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे ३५ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उकृष्ठ दर्जा व प्रावीण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. ३१ ऑगस्ट १९२६ साली त्याकाळच्या ब्रिटिश सरकारच्या आश्रयाने स्थापन झालेल्या या संस्थेला सर्वार्थाने आधुनिक रूप देऊन तिला २१व्या शतकात उत्तुंग शिखरावर नेण्यात चव्हाण यांची डायनॅमिक लीडरशिप कारणीभूत आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टला संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस आणि दीक्षांत समारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या मेयर हॉल, स्थानिकराज भवन, सी. डी. बर्फीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे होणार आहे. ”
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजीतसिंह गायकवाड उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे ३५ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
“अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उकृष्ठ दर्जा व प्रावीण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. ३१ ऑगस्ट १९२६ साली त्याकाळच्या ब्रिटिश सरकारच्या आश्रयाने स्थापन झालेल्या या संस्थेला सर्वार्थाने आधुनिक रूप देऊन तिला २१व्या शतकात उत्तुंग शिखरावर नेण्यात चव्हाण यांची डायनॅमिक लीडरशिप कारणीभूत आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टला संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.”

