Sunday, April 27, 2025
Homeकल्चर +‘प्रीत अधुरी’चा आज...

‘प्रीत अधुरी’चा आज वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा आज अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होत आहे.

चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, जी व्यक्तीच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते! नायकच्या घरी ती वस्तू येते तेव्हा त्याच्यासाठी आकाश ठेंगणं होतं. आता नायक आणि नायिका या वस्तूचा वापर करून नेमकं काय मागतात आणि त्यातून पुढे कशा घडामोडी घडत जातात, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं असून प्रवीण यशवंत आणि प्रिया दुबे या नव्या जोडीच्या भन्नाट केमिस्ट्रीसोबत संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

गूढ आणि रहस्यमय कथा नेहमीच प्रेक्षकांना खास आकर्षित करतात, म्हणूनच अशा विषयांवर ‘प्रीत अधुरी’सारखे खास चित्रपट प्रदर्शित करून रसिकांचं झकास मनोरंजन करण्याचा आमचा कायम सकारात्मक हेतू असतो. अल्ट्रा झकासचे वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content