आ. राजेंद्र राऊत हे बार्शीचे भागीरथ आहेत. बार्शीकरांनी जसे आ. राजेंद्र राऊत यांच्यावर प्रेम केले तसाच आशीर्वाद ते अर्चना पाटील यांना देतील हा माझा विश्वास आहे. कारण ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडेच सरशी, असे उद्गार भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काला काढले.

धाराशिव लोकसभा महायुती (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शी, सोलापूर येथे आयोजित जाहीर सभेत फडणवीस उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.

जो झुकतो तो नाही तर जो झुकवतो तो नेता असतो. देशाला मजबूर नाही मजबूत नेत्याची गरज आहे आणि असे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. देश राहिला तरच आपण राहू म्हणूनच पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी पोहोचवणे गरजेचे आहे. आज अर्चना पाटील यांना मत देऊन देश मजबूत करण्याची संधी बार्शीकरांकडे आहे. बार्शीकर मोठ्या प्रमाणात समर्थन देऊन अर्चना पाटील यांना संसदेत पाठवतील हा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मंत्री डॉ. तानाजी सावंत, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राजेंद्र राऊत, आ. राणा जगजीतसिंह पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.