Homeन्यूज अँड व्ह्यूजयुसीसी ठरते फसव्यांची...

युसीसी ठरते फसव्यांची मदतगार!

अनसोलिसीटेड कमर्शियल कम्युनिकेशन, युसीसी (UCC), म्हणजेच गरज नसताना पुरवली जाणारी व्यावसायिक माहिती, लोकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरते आणि त्यांच्या गोपनीयतेला बाधा पोहोचवते. फसवणूक करणाऱ्यांद्वारे अशाच स्वरूपाच्या माहितीचादेखील वापर केला जातो, या निष्कर्षापर्यंत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) पोहोचले असून याला आळा घालण्याकरीता कोणत्या उपाययोजना करायच्या यावर प्राधिकरण विचार करत आहे.

ट्राय (TRAI), अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मंगळवारी नवी दिल्लीतल्या ट्रायच्या मुख्यालयात नियामकांच्या संयुक्त समितीची (JCoR) बैठक आयोजित केली होती. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), ग्राहक व्यवहार मंत्रालय (MoCA) आणि JCoRचा सदस्य म्हणून ट्रायचे प्रतिनिधी, विशेष निमंत्रित म्हणून दूरसंचार विभाग (DoT) आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी (MHA) या बैठकीला उपस्थित होते.

युसीसी

ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी बैठकीला संबोधित केले. JCoR हा ट्रायद्वारे सुरु करण्यात आलेला एक सहयोगी उपक्रम असून, डिजिटल जगात नियामक परिणामांचा अभ्यास करणे आणि नियमांच्या अंमलबजावणीवर सहकार्याने काम करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. युसीसी आणि फसवणुकीची प्रकरणे हाताळण्यासाठी दूरसंचार संसाधनांद्वारे अंमलात आणण्याजोग्या विविध संभाव्य सहयोगी पद्धती आणि उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीत चरचेला आलेले महत्त्वाचे मुुद्दे-

अनधिकृत 10-अंकी मोबाईल क्रमांक तसेच लँडलाइन नंबरवरून येणारे अनपेक्षित कॉल.

प्रमोशनल कॉल करण्यासाठी प्रिन्सिपल एंटिटीज (दूरसंचार संसाधनांचा वापर करून व्यावसायिक संवाद करणाऱ्या संस्था)द्वारे 140 सिरीजचा वापर.

ग्राहक सहज ओळखण्यासाठी प्रिन्सिपल एंटिटीजद्वारे सेवा आणि व्यवहारविषयक कॉल करण्यासाठी 160 सिरीजचा वापर.

यूसीसी कॉल्स आणि मेसेज रोखण्यामधील प्रिन्सिपल एंटिटीज, विशेषतः BFSI (बँकिंग, वित्त सेवा आणि विमा) क्षेत्रातील संस्थांची भूमिका.

दूरसंचार सेवा प्रदात्यांनी स्थापित केलेल्या डिजिटल संमती संपादन (DCA) प्रणालीच्या मदतीने, ओटीपीचा वापर करून ग्राहकांकडून योग्य पडताळणीसह सोप्या आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रिन्सिपल एंटिटीजद्वारे, डिजिटल संमती संपादन करणे. DCA, ग्राहकांकडून मिळालेली संमती रद्द करण्याचीदेखील परवानगी देते.

सामग्री टेम्पलेट्समध्ये Urls/Apks/OTT लिंक्स/कॉल बॅक नंबरचे व्हाइटलिस्टिंग.

दूरसंचार संसाधनांचा वापर करून फसवणुकीवर नियंत्रण मिळवणे आणि केवायसी प्रक्रिया अधिक मजबूत करणे.

विविध मंचाच्या मदतीने माहितीचे आदान-प्रदान.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content