Wednesday, January 15, 2025
Homeमाय व्हॉईसउबाठाला आता भगव्या...

उबाठाला आता भगव्या झेंड्याचीही अ‍ॅलर्जी!

बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी हिंदूत्व सोडले. आता तर उबाठाला शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याचीही अ‍ॅलर्जी झालीय. आता तर त्यांच्या प्रचार रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीतजास्त खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आपले सरकार येण्यापूर्वी सगळी कामे बंद होती. मेट्रो कारशेड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईचे सौंदर्यीकरण असे अनेक प्रकल्प महायुतीने सुरु केले. दोन अडीच वर्षांत मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी रस्त्यावर केवळ डांबर टाकायचे आणि त्यात पैसे खायचे. यासाठी महापालिकेचे दहा वर्षांत साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील २५-३० वर्षांत रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असेही ते म्हणाले.

उबाठा

रखडलेले प्रकल्प, कोणामुळे अडकलेले प्रकल्प मार्गी लावून मुंबईबाहेर फेकलेल्या मुंबईकरांना हे सरकार परत आणणार आहे. त्यासाठी बीडीडी प्रकल्प, पोलिसांची घरे म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसीच्या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसाठी इतके वर्षं काय केले, याचा हिशेब मुंबईकर येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. ज्या उपक्रमातून मुंबईकरांना लाभ होत असेल तर हा मुख्यमंत्री ते करायला तयार आहे, असे ते म्हणाले. पुनर्विकास रखडलेल्या ३८८ इमारतींसाठी नगरविकास विभागाला वेगळा नियम करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

ही निवडणूक देश घडवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत देशाला जगभरात मानसन्मान मिळवून दिला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी यामिनी जाधव यांना निवडून द्यायचे आहे. आपल्या सरकारमध्ये भेदभाव नाही. हिंदू असो वा देशभक्त मुसलमान सर्वांना समान वागणूक दिली जाते. मात्र उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. त्यांच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटीतील आरोपी इक्बाल मुसा फिरतो. याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण होते. मुंबई हल्ल्यातील शहिद पोलिसांचा अपमान केला. अशा ढोंगी लोकांना निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content