Homeचिट चॅटश्री स्वामी समर्थ...

श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह संपन्न!

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह शनिवारी पारंपरिक पद्धतीने मंगलअष्टकाच्या सुरात, भक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. महेश नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील पुजाऱ्यांनी धार्मिक विधी पार पाडले.

मंदिरावर रंगबेरंगी दिव्यांच्या आकर्षक रोषणाईबरोबर एक भव्य रांगोळी मंदिराच्या प्रांगणात घालण्यात आली होती. ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. तुलसी विवाह म्हणजे तुळशीच्या रोपाचे विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्णाशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला “प्रबोध” उत्सव असे म्हणतात.भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.

तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते. शिवाय तुलसी विवाह केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच धनलाभही होतो, असेही मानले जाते.

दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे… शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची… कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. या वर्षी मंगळवारपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुलसी विवाह महाराष्ट्राच्या बरोबरीने शेजारील गोव्यातदेखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content