Homeमुंबई स्पेशलउद्या चेंबूर परिसरातल्या...

उद्या चेंबूर परिसरातल्या काही भागात पाणी नाही!

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उद्या, बुधवार ते गुरुवार, ३० मेदरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातल्या काही भागांना उद्या बुधवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात नसणार पाणी-

१) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८)– लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस (बुधवार, दिनांक २९.०५.२०२४  रोजी सकाळी १०.०० ते गुरुवार, दिनांक ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

पाणी

२) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५)- माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी (बुधवार, दिनांक २९.०५.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवार, दिनांक ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा तसेच पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content