Saturday, July 27, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटइफ्फीमध्ये सादर झाला...

इफ्फीमध्ये सादर झाला ‘ल्युटो’चा वर्ल्ड प्रीमियर!

‘ल्युटो’ या मेक्सिकन चित्रपटाच्या टीमने गोव्यातल्या 54व्या इफ्फीच्या निमित्ताने माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला. डॉक्यु-मॉन्टेज श्रेणी अंतर्गत येथे ‘ल्युटो’चा वर्ल्ड प्रीमियर झाला. पॅनेलमध्ये दिग्दर्शक आंद्रेस आरोची टिनाजेरो, निर्माता सॅंटियागो ट्रॉन, अभिनेत्री डॅनिएला वाल्डेझ आणि अभिनेता रॉड्रिगो अझुएला यांचा समावेश होता.

स्पॅनिश भाषेत प्रदर्शित झालेला 110 मिनिटे कालावधीचा हा चित्रपट, दु:खाचा वेध घेतो. तो मेक्सिकन परिदृश्यात चित्रित केला असून लोक श्रद्धा, पंथ आणि धर्म यासह दुःखाच्या विविध टप्प्यांमधून कसे जातात हे त्यात दाखवले आहे. 

या चित्रपटामागील प्रेरणेबद्दल दिग्दर्शकाने सांगितले की, त्याला त्याच्या सर्व अगतिकतेसह मनापासून चित्रपट तयार करायचा होता. लोकांच्या मारण्याची मला कधीच भीती वाटली नाही. मात्र माझ्या लोकांच्या मृत्यूची, त्यांच्या दु:खाची भीती वाटते आणि माझ्यासाठी हा चित्रपट दु:खाला कसे सामोरे जायचे याविषयी आहे, असे अँड्रेस यांनी नमूद केले.

दुःखाचा सामना करणे खूप कठीण आहे यावर रॉड्रिगोने भर दिला. सन्मानाने आणि आनंदाने दुःखाला सामोरे जाण्याबाबत यात अधिक भर दिला आहे. दु:ख म्हणजे तुम्ही प्रेमासाठी दिलेली किंमत आहे आणि प्रेम त्यासाठी तेवढे नक्कीच लायक आहे, असे अभिनेत्याने सांगितले.

दु:खाला सामोरे जाण्यासाठी विविध आचार पद्धतींच्या भूमिकेवर दिग्दर्शकाने भाष्य केले. ते म्हणाले की, मेणबत्ती लावणे असो, तुमच्या गावी जाणे असो, प्रार्थना करणे असो किंवा तुमचा आवडता पदार्थ शिजवणे असो, हे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या हृदयात त्याला काय करायचे हे माहित असते आणि ते करण्यासाठी त्यांना त्यांच्या भीतीचा सामना करणे आवश्यक आहे. आणि हीच दु:खाची ताकद आहे, अस्पर्श अशा प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे. 

डॅनिएला तिचे वैयक्तिक अनुभव सामायिक करताना म्हणाली, मी स्वतःला भावनांमधून जाऊ देते, दुःखी आणि रिकामे वाटू देते. हे कठीण आहे, मात्र टीम मला ऊर्जा परत मिळवण्यास मदत करते.

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर होणाऱ्या दुःखाबद्दल बोलताना निर्माता सॅंटिआगोने नमूद केले की, संपूर्ण मेक्सिकोमध्ये डे ऑफ द डेड साजरा केला जातो. ‘डे ऑफ द डेड’ ही कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची मेक्सिकन परंपरा आहे जिथे मृत पूर्वज हे सन्माननीय पाहुणे असतात. मृत प्रियजनांचे स्मरण करण्याचा आणि त्यांची आठवण काढून हा दिवस साजरा केला जातो.

याविषयी अधिक माहिती देताना आंद्रेस म्हणाले की, देशातील प्रत्येक भाग हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. माया संस्कृतीत मृत्यूनंतरचे जीवन आहे. आणि मेक्सिकोमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. दर वर्षी तुम्ही आपल्या मृत नातेवाईकांची आठवण काढता, त्यांचे स्मरण करता.

चित्रीकरणासाठी मेक्सिकोमध्ये प्रवास करताना आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, अनोळखी लोकांचे स्वागत करणे आणि आपले अनुभव एकमेकांना सांगणे, या बाबतीत भारत आणि मेक्सिको दोन्ही देश सारखेच आहेत.

चित्रपटाचा सारांश:

आपल्या मैत्रिणीच्या निधनामुळे झालेल्या दुःखावर मात करण्याच्या प्रयत्नात, डॅमियन मेक्सिकोच्या प्रवासाला निघाला आहे. आठवणी आणि पश्चात्तापाने पछाडलेल्या डॅमियनला अनोळखी लोकांशी संवाद साधल्यावर दिलासा मिळतो. मृत्यूच्या वेदनेवर मात करण्यासाठी ते ज्या विधींमध्ये सहभागी होतात, त्याचा तो अनुभव घेतो.

54 व्या इफ्फी मधील डॉक्यु-मॉन्ताज विभाग

डॉक्यु-मॉन्ताज विभागात जगभरातील आकर्षक माहितीपटांचा एक संच बनवण्यात आला आहे. भारताचा ऑस्कर प्रवेश चिन्हांकित करण्यासाठी या वर्षी हा विभाग सादर करण्यात आला आहे. चित्रपटनिर्मितीमधील माहितीपटांचे वाढते महत्त्वही तो अधोरेखित करतो. 54व्या इफ्फीमध्ये प्रदर्शनासाठी या श्रेणी अंतर्गत दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!