Homeटॉप स्टोरी20 मेला होणार...

20 मेला होणार 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे:

धुळे- 18, दिंडोरी- 10, नाशिक- 31, पालघर- 10, भिवंडी- 27, कल्याण- 28, ठाणे- 24, मुंबई उत्तर- 19, मुंबई उत्तर-पश्चिम- 21, मुंबई उत्तर-पूर्व- 20, मुंबई उत्तर-मध्य- 27, मुंबई दक्षिण-मध्य- 15 आणि मुंबई-दक्षिण- 14.

या आहेत मुंबईतल्या प्रमुख लढती

उत्तर मुंबई- पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

उत्तर-पश्चिम मुंबई- अमोल कीर्तिकर (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध रविंद्र वायकर (शिवसेना).

उत्तर-पूर्व मुंबई- नंदेश उमप (बहुजन समाज पार्टी) विरूद्ध मिहिर कोटेचा (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध संजय पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे).

उत्तर-मध्य मुंबई- ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस).

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध यामिनी जाधव (शिवसेना).

दक्षिण-मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध राहुल शेवाळे (शिवसेना).

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content