Homeकल्चर +९ मार्चला मुंबईत...

९ मार्चला मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍ड’ची ग्रॅण्‍ड फिनाले

७१व्या मिस वर्ल्‍ड सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन येत्या ९ मार्चला मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्‍या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्‍यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्‍यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.

जगभरातील देशांमधील १२० महिला स्‍पर्धक विविध स्‍पर्धा आणि चॅरिटेबल उपक्रमांमध्‍ये सहभाग घेतील, तसेच त्‍या परिवर्तनाच्‍या अॅम्‍बेसेडर्सदेखील बनतील. आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्री-लाँच परिषदेमध्‍ये माजी मिस वर्ल्ड विजेत्या टोनी ॲन सिंग, व्हेनेसा पोन्स डी लिऑन, मानुषी छिल्लर आणि स्टेफनी डेल व्हॅले यांच्यासह सध्याची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का पहिल्यांदाच ग्रॅण्‍ड फिनालेसाठी एकत्र मंचावर आल्‍या. या मिस वर्ल्‍ड सोहळ्याला २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीमधील आलिशान हॉटेल द अशोक येथे ‘उद्घाटन समारोह’ आणि इंडिया टुरिझम डेव्‍हलमेंट कॉर्पोरेशन (आयटीडीसी)चा ‘इंडिया वेलकम्‍स द वर्ल्‍ड गाला’सह सुरूवात होईल.

मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनच्‍या अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जुलिया मोर्ले सीबीई म्‍हणाल्‍या की, भारताप्रती माझे प्रेम लपलेले नाही आणि या देशामध्‍ये ७१व्या मिस वर्ल्‍ड फेस्टिवलचे आयोजन माझ्यासाठी उत्‍साहवर्धक बाब आहे. भारतात या फेस्टिवलला पुन्‍हा आणण्‍याचे स्‍वप्‍न सत्‍यात अवतरण्‍यासाठी जमिन सैदी यांचे त्‍यांच्‍या अथक प्रयत्‍नांकरिता मनापासून आभार. आम्‍ही ७१व्‍या पर्वासाठी अत्‍यंत सर्वोत्तम टीम एकत्र केली आहे. १२० मिस वर्ल्‍ड नेशन्‍सचे स्‍वागत, ज्‍यांनी जगभरातील त्‍यांच्‍या ‘ब्‍युटी विथ ए परपज अॅम्‍बेसेडर्स’ना पाठवले आहे. आम्‍ही तुम्‍हा सर्वांचे ७१वा मिस वर्ल्‍ड फेस्टिवलमध्‍ये स्‍वागत करतो.

भारतातील ७१व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलचे भव्‍य सेलिब्रेशन उल्‍लेखनीय क्षण आहे, कारण हा सोहळा २८ वर्षांनंतर देशात परतला आहे. ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यासारख्या उल्लेखनीय व्यक्तींसह असंख्य मिस वर्ल्ड विजेत्यांचा समृद्ध वारसा भारताला लाभला आहे. या यशामुळे जागतिक स्तरावर भारताचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. १९५१मध्ये सुरू झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा पारंपरिक सौंदर्य स्पर्धांच्या पलीकडे जात परोपकार आणि सेवेद्वारे महिलांना सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन तत्त्वांचा अवलंब करते.

७१व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलचे प्रोडक्‍शन सहयेागी आहेत एण्‍डेमोल शाइन – मनोरंजन टेलिव्हिजनमधील जागतिक अग्रणी कंपनी, जिचे नेतृत्त्‍व त्‍यांचे अद्वितीय सीईओ रिषी नेगी यांच्‍याद्वारे केले जाते. रिषी व त्यांची टीम मिस वर्ल्‍ड फेस्टिवलचे उल्‍लेखनीय व व्‍यापक कव्‍हरेज प्रदान करण्‍यासाठी आमची एक्‍सक्‍लुसिव्‍ह लाइव्‍ह ब्रॉडकास्‍ट सहयोगी सोनी लिव्‍हसोबत काम करणार आहे.

सोनी लिव्‍ह आणि स्‍टुडिओनेक्‍स्‍टचे व्‍यवसाय प्रमुख दानिश खान म्‍हणाले की, आम्‍हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, सोनी लिव्‍ह मिस वर्ल्‍ड ब्‍युटी पेजंटसाठी विशेष स्‍ट्रीमिंग व्‍यासपीठ असणार आहे आणि आम्‍हाला खात्री आहे की, मिस वर्ल्‍ड सादर करणारे भव्‍यता, हेतू व सांस्‍कृतिक विविधतेच्‍या या जागतिक प्रदर्शनाचे लाइव्‍ह टेलि‍कास्‍ट सर्वसमावेशक अनुभव असेल.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत बनिजय एशिया अॅण्‍ड एण्‍डेमोलशाइन इंडियाचे ग्रुप सीओओ रिषी नेगी म्हणाले की, आम्‍हाला जगभरातील सर्वात प्रसिद्ध इव्‍हेण्‍टमध्‍ये आमचे प्रॉडक्‍शन कौशल्‍य आणण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे हाय-प्रोफाइल प्रकल्‍पांचा आमचा पोर्टफोलिओ अधिक दृढ होईल. मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनसोबतच्‍या या सहयोगामधून जागतिक दर्जाचे कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याप्रती आमची कटिबद्धता, तसेच प्रतिष्ठित जागतिक इव्‍हेण्‍ट्सचे व्‍यवस्‍थापन करण्‍याप्रती आमची क्षमता दिसून येते.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content