Saturday, July 27, 2024
Homeचिट चॅट27व्या राष्ट्रीय युवा...

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप!

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप कार्यक्रम महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडला. यावेळी शहरातील हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे आयोजित रंगारंग कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, युवा कार्य मंत्रालयाच्या संचालिका वनिता सूद, युवा कार्य मंत्रालयाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयामार्फत दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 12 ते 16 जानेवारीदरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन गेल्या शुक्रवारी, 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण तथा माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

या निमित्ताने 16 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याला या महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी मिळाली. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे 8 हजार तरुणांनी या पाच दिवसीय महोत्सवात सहभाग घेतला. तसेच एक लाखाहून अधिक नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली.

यामध्ये नेहरू युवा केंद्र संघ (एनवायके) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या स्वयंसेवकांनी तसेच स्थानिक प्रशासनाने कठोर परिश्रम करून हा महोत्सव यशस्वी करण्यास मदत केली.

या महोत्सवादरम्यान केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री  निशित प्रामाणिक यांनी राष्ट्रीय युवा पुरस्काराने 15 तरुणांचा सन्मान केला. तसेच कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

युवा

हनुमान नगरच्या महायुवा ग्रमा येथे युवा कृति नामक प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात देशभरातील  घरगुती उत्पादने सादर केली आणि लोकांनी खरेदी केली. महाएक्सपो प्रदर्शनात  राज्यातील तरुणांना त्यांचे संशोधन जगाला दाखवण्याची संधी मिळाली. याशिवाय, विविध विषयांवर आयोजित चर्चासत्र, वेगवेगळ्या क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सुविचार संमेलन यांनी तरुणांना प्रेरणा दिली.

मंगळवार, 16 जानेवारी रोजी झालेल्या आयोजित समारोप कार्यक्रमामध्ये देशभरातून आलेल्या युवकांनी तरुणांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन सर्वांना दिले. महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून आलेल्या तरुण कलाकारांनी येथील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कलेने प्रेरित केले तसेच या माध्यमातून स्थानिक नागरिकांनाही एक आनंददायी अनुभव मिळाला.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात बोलताना महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने प्रचंड मेहनत घेऊन या महोत्सवाचे आयोजन केले, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आनंदी झाले.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांमधील छुपे कलागुण बाहेर येण्यासाठी चांगले प्रयत्न करण्यात आले. यामुळे देशातील प्रत्येक राज्यातील तरुणाला फायदा होईल, तसेच तरुणांमध्ये एकता आणि राष्ट्रवादाचे मूल्य रुजवण्यासाठीही राष्ट्रीय युवा महोत्सव उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी म्हटले.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!