Saturday, June 22, 2024
Homeमाय व्हॉईसजेमतेम २०-२२ जागा...

जेमतेम २०-२२ जागा लढवणाऱ्या ठाकरे-केजरीवालांना पंतप्रधानपदाची स्वप्ने!

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतीम टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. या अखेरच्या टप्प्याकरीता मतदान होण्याआधीच निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. गेल्या आठवड्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाहीत, असा दावा करू लागले आहेत. उद्धव ठाकरे तर प्रत्येक भाषणात, मुलाखतीत चार जूननंतर डीमोदीनेशन होणार, असे छाती ठोकून सांगत आहेत. बीकेसीवर झालेल्या सांगता सभेतही उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांनी हाच दावा केला.

ठाकरे

हेच नेते भारतीय जनता पार्टीच्या ४०० पारच्या नाऱ्याला उत्तर देताना भाजपा यावेळी २०० पारही करणार नाही, असा दावा ठोकत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्या या दाव्याला समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राहुल गांधी यांनीही समर्थन दिले आहे. ममता बॅनर्जींनी तर भाजपा १४० जागाही पार करणार नाही, असा दावा केला आहे. विरोधी पक्षाचे नेते चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत हे नक्की असे ठासून सांगत आहेत. याचाच अर्थ त्यांची इंडिया आघाडी सत्तेत येणार. मग पंतप्रधान कोण? एक चेहरा तरी आहे का त्यांच्याकडे? इंडिया आघाडी सत्तेवर येणार म्हणून दावा करणाऱ्या या नेत्यांनी आघाडीत तरी एकवाक्यता ठेवली आहे का? तामीळनाडूत कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसच्या राहुल गांधींविरूद्धच उमेदवार दिला आहे. तिथे हरण्याची शक्यता लक्षात घेऊन राहुल गांधींनी आता रायबरेली, या गांधी कुटुंबाबरोबर कायम राहिलेल्या मतदारसंघाचा आधार घेतला आहे. प. बंगालमध्ये तृणमूलने एकला चलोचा नारा प्रत्यक्षात उतरवला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनेही तशीच भूमिका घेतली आहे. तामिळनाडूत डीएमके स्वबळावर किल्ला लढवत आहेत. अशा स्थितीत इंडिया आघाडीला संधी मिळाली तर ते सरकार बनवू शकतील?

ठाकरे

बरे. या इंडिया आघाडीत काँग्रेस सोडून एकही पक्ष तीन आकडी जागा लढवत नाही. फक्त काँग्रेसच असा पक्ष आहे की जो ३२८ जागा लढवत आहे. उरलेल्या पक्षात ठाकरेंची शिवसेना २१, डीएमके २१, शरद पवारांची राष्ट्रवादी १०, तृणमूल ४२, समाजवादी पार्टी ५७, राष्ट्रीय जनता दल २४, आम आदमी पार्टी २० जागा लढवत आहेत. लोकसभेच्या एकूण जागा आहेत ५४३. बहुमतासाठी लागणार २८२. भाजपा स्वतः ४३० जागा लढवत आहे. भाजपाचे मित्रपक्ष मिळून १०९ जागा लढवत आहेत. जे पक्ष जेमतेम २०-२२ जागाही लढवत नाहीत ते आज पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत आणि हेच नेते देशात लोकशाही धोक्यात असल्याबद्दल टाहो फोडत आहेत.

ठाकरे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारूच्या ठेक्याच्या आरोपावरून तुरुंगात होते. आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे एक जूनपर्यंत पक्षाच्या प्रचारासाठी म्हणजेच आम आदमीच्या प्रचारासाठी ते अंतरिम जामीनावर बाहेर फिरताहेत. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी भाजपा सत्तेवर येणार नसल्याचा दावा केला. यापुढे आमचे सरकार असेल. सत्तेवर आल्यानंतर आम्ही अमुक करू, आम्ही तमूक करू असा दहा कलमी कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आहे. काँग्रेसने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजनेअंतर्गत गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्यविमा, शेतीवरचा जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार. युपीए सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मोफत दिले जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. जवळपास तशीच आश्वासने ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिली आहेत. घटनेनुसार ५० टक्के आरक्षणाचा कोटा वाढवण्याची ग्वाही यांनी दिली आहे.

ठाकरे

देशाला स्थिर सरकार लाभले की कशी प्रगती होते हे पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत भारतीय जनतेने अनुभवले आहे. याऊलट स्थिर सरकार नसेल तर देशाची कशी वाताहात लागते. काळ निरर्थक कसा निघून जातो हेही आपण अनुभवले आहे. मोरारजी देसाई (२ वर्षे १२६ दिवस), चौधरी चरणसिंह (१७० दिवस), व्ही. पी. सिंह (३४३ दिवस), बी. एस. चंद्रशेखर (२२५ दिवस), अटलबिहारी वाजपेयी (१६ दिवस), एच. डी. देवेगौडा (३२४ दिवस), इंदर कुमार गुजराल (३३२ दिवस) पंतप्रधान असतानाचे अनुभवही आपण घेतले आहेत. याच औट घटकेच्या पंतप्रधानांकडे पाहत उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल आदी जेमतेम २०-२२ जागा लढवणारे नेते पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत. अशा स्थितीत स्थिर सरकारच्या दिशेने वाटचाल करायची की ठिगळे जोडत गोधडी विणायची हे तुम्ही ठरवा!

ठाकरे

Continue reading

राहुलजींनी आपल्या आईचे ऐकले असते तर..

आत्याबाईला मिशा असत्या तर.. मी म्हणेन ती पूर्व दिशा झाली तर.. राजकारणात जरतरला काही किंमत नाही. प्रत्येक नेता हेच सांगत असतो. आता बघा ना.. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी दिलेला सल्ला जर, आता त्यांची चालते त्या खासदार राहुल गांधींनी...

राहुल गांधी, ठाकरेंना जायचंय कुठे? आदमबाबाच्या काळात??

मुंबईतला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय झाला आहे की काय, असा प्रश्न पडतो. कारण फक्त एकच, की येथे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांचा विजय अगदी निसटता झाला असला तरी...

पंतप्रधान मोदींचा हिंदू-मुस्लीमचा मुद्दा भाजपाला भोवला!

गुळगुळीत नाण्याला घासणार तरी किती? हिरा कितीही मौल्यवान असला तरी त्याला पैलू पाडण्यालाही मर्यादाच असतात. अगदी त्याचप्रमाणे लोकसभेच्या या निवडणुकीत झाले. गेली १० वर्षे सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावर भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सहकारी पक्षांनी ही...
error: Content is protected !!