Wednesday, January 15, 2025
Homeचिट चॅटमहामानवाला अभिवादन करा...

महामानवाला अभिवादन करा शैक्षणिक साहित्य अर्पण करून..

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य अर्पण करून अभिवादन करावे, असे आवाहन ‘एक वही एक पेन’ अभियानाचे प्रणेते, ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून महामानवाला वह्या, पेन, पुस्तकांची मानवंदना द्यावी, असा उपक्रम मागील नऊ वर्षांपासून ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या माध्यमातून राबविला जातो. महापरिनिर्वाण दिन, महापुरुषांची जयंती उत्सव तसेच गणेशोत्सवासारख्या सर्व सार्वजनिक उत्सवातदेखील जनतेने शैक्षणिक जागर करून गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन ते सातत्याने करतात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जातो.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण घेतले. परदेशात जाऊनदेखील त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या. देशाला सर्वोच्च संविधान दिले. वंचित घटकांना आरक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत शिक्षणाची कास सोडली नाही. ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले. समाजालाही त्यांनी शिक्षण घेण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांना हार-फुले वाहून अभिवादन करण्यापेक्षा वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली राहणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही सूचना स्वीकारून समाजाला शिक्षणाप्रती सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहनही झनके यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content