Sunday, April 27, 2025
Homeएनसर्कलफ्रान्सच्या सिनेटमध्ये सच्चिदानंद...

फ्रान्सच्या सिनेटमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सन्मानित

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणारे, साधनेविषयी दिशादर्शन करून जगभरातल्या साधकांचे जीवन आनंदमय करणारे, विज्ञानयुगात सोप्या सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रसार करून समाजाला दिशादर्शन करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना काल फ्रान्सच्या सिनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल, मेहेंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेश पुरी महाराज, ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेडरिक बुवेल यांच्या हस्ते भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘संस्कृती युवा संस्थे’ने या पुरस्कारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निवड केली होती. यावेळी ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा म्हणाले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता अन् सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रीसत्‌शक्ति बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केल्याविषयी सनातन संस्था ही ‘संस्कृती युवा संस्था’ आणि संस्थेचे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा यांच्याप्रती कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासम उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधनकार्य आणि ग्रंथलेखन, तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचाच आज एकप्रकारे गौरव झाला आहे, असे आम्ही मानतो.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content