Thursday, January 23, 2025
Homeकल्चर +घराणेशाहीतल्या सत्तासंघर्षाच्या 'लोकशाही'चे...

घराणेशाहीतल्या सत्तासंघर्षाच्या ‘लोकशाही’चे पोस्टर लाँच!

वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शाश्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.ने हा चित्रपट प्रस्तुत करत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लोकशाही’च्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण जागी झाली होती. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे. नेमके हे आव्हान काय असणार आहे? आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे?, हे गुपित प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ठळक साद घालत आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा ‘लोकशाही’ चित्रपट संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘लोकशाही’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे. “आपण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही अस्तित्वात असताना त्याला ठेच पोहोचवणाऱ्या राजकारण्यांचं आणि त्यांच्या भ्रष्ट राजकारणाचं वास्तव प्रखरपणे सांगणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाला नक्कीच तुफान प्रतिसाद मिळेल याची आम्हाला शास्वती आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

लोकशाही’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठीhttps://m.facebook.com/story.php?story_fbid=

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...
Skip to content