Wednesday, January 15, 2025
Homeडेली पल्सराज्यपालांच्या हस्ते ११५ पोलिसांना...

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलिसांना पोलीस पदके प्रदान

राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज विविध पोलीस पदके प्रदान करण्यात आली. मुंबईत राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१च्या स्वातंत्र्यदिनी तसेच २०२२च्या प्रजासत्ताकदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. ३० पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आले तर ७ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली. ७८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

विनय कारगांवकर (सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, वाहतूक मुंबई), आशुतोष डुंबरे (आयुक्त ठाणे शहर), अशोक अहिरे (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण), विनोदकुमार तिवारी (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर जिल्हा), प्रल्हाद खाडे (सेवानिवृत्त समादेशक, रा रा पो बल गट क्र. ६, धुळे), चंद्रकांत गुंडगे (सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड) व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नांदेड) यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

पदकाने सन्मानित पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी अशी..

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content