जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई महापालिकेने मुंबईत महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत काल पालिकेने सांताक्रूझच्या लायन्स जुहू महापालिका चिल्ड्रन पार्क येथे गोरखचिंचेचे पूर्णपणे वाढलेली झाडे लावण्यात आली. सेवाभावी संस्थेचे अशोक कोठारी आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते, असे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.