Homeब्लॅक अँड व्हाईटफिजिक्‍सवालाचे ठाण्यातले ऑफलाइन...

फिजिक्‍सवालाचे ठाण्यातले ऑफलाइन विद्यापीठ सेंटर सुरु 

फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) या भारतातील आघाडीच्‍या एड-टेक व्‍यासपीठाने ठाण्यात त्‍यांचे तिसरे तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर नुकतेच लाँच केले. या सेंटरच्‍या उद्घाटनप्रसंगी महाराष्‍ट्र विधानपरिषदेचे सदस्‍य रविंद्र फाटक, नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि फिजिक्‍सवालाचे सीएचआरओ सतिश खेंगरे उपस्थित होते.

पीडब्‍ल्‍यूच्‍या ठाणे, मुंबई विद्यापीठ सेंटरमध्‍ये अत्‍याधुनिक पायाभूत सुविधांसह १५ तंत्रज्ञान-सक्षम क्‍लासरूम्‍स आहेत, जे नीट/जेईई/फाऊंडेशन इच्‍छुकांसाठी अनुकूल अध्‍ययन वातावरण देतात. शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ नोंदणीसाठी हे सेंटर या शैक्षणिक वर्षाकरिता नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांना २० टक्‍क्‍यांची अतिरिक्‍त सूट देत आहे.

पीडब्‍ल्‍यू ऑफलाइनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्‍ता म्हणाले की, लाँच करण्‍यात येणाऱ्या प्रत्‍येक ऑफलाइन सेंटरसह आम्‍ही भारतभरात शैक्षणिक हब्‍स स्‍थापित करण्‍याच्‍या, तसेच दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाची पूर्तता करण्‍याच्‍या जवळ पोहोचत आहोत. हे सेंटर्स देशातील शैक्षणिक लँडस्‍केपमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहेत.

पीडब्‍ल्‍यूने संपूर्ण भारतात ७९ तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर्स सुरू केले आहेत. जवळपास दोन वर्षांमध्‍ये २ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांना सेवा देत तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑफलाइन नेटवर्कसह ती झपाट्याने विकसित होणारी एड-टेक कंपनी म्‍हणून उदयास आली आहे. हे सेंटर्स जेईई/नीट परीक्षांसाठी सर्वसमावेशक अभ्‍यासक्रम देतात.

पीडब्‍ल्‍यू ऑफलाइन विद्यापीठ सेंटर्स रेकॉर्ड केलेल्‍या लेक्चर्सची सुविधा, एनसीईआरटी मटेरिअल्‍ससह साह्य, ऑफलाइन शंकांचे निरसन, डेअली प्रॅक्टिस प्रॉब्‍लेम्‍स (डीपीपी)सह व्हिडिओ सोल्‍यूशन्‍स, विशेषीकृत मॉड्यूल्‍स आणि प्रीव्‍हीयस इअर क्‍वेश्‍चन्‍स (पीवायक्‍यू) देतात. या सेंटर्समध्‍ये स्‍टुडण्‍ट सक्‍सेस टीम (एसएसटी) साठी समर्पित डेस्‍कदेखील आहे, ज्‍यामुळे पीडब्‍ल्‍यू विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या समस्‍यांसाठी जलद व वैयक्तिकृत रिसोल्‍यूशन्‍स देणारे एकमेव व्‍यासपीठ आहे. तसेच पॅरेण्‍ट-टीचर डॅशबोर्ड सिस्‍टमदेखील आहे, जी विद्यार्थ्‍यांच्‍या प्रगतीबाबत रिअल-टाइम अपडेट्स देते.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content