Wednesday, January 15, 2025
Homeबॅक पेजदिवाळीनिमित्त मुंबईत ९...

दिवाळीनिमित्त मुंबईत ९ ठिकाणी रंगणार ‘नमो उत्सव’!

गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र उत्सवाप्रमाणेच आता मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे शहरासह उपनगरात नमो उत्सवांतर्गत दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा नमो उत्सव साकारला असून अनेक मान्यवर कलावंत, गीत, संगीत आणि सूरांच्या मैफलीत तब्बल ९ ठिकाणी हा उत्सव साजरा करणार आहेत.

नमो उत्सवात रविवारी (ता.१२) रोजी पहाटे ६ वाजता वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात प्रख्यात गायिका आरती अंकलीकर- टिकेकर, संजीव चिम्मलगी यांची मैफल होणार आहे. या मैफलीचे निवेदन अमित काकडे तर संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असणार आहे.

शिवडी विधानसभा अंतर्गत नमो उत्सवात शुक्रवारी (ता.१०) रोजी सायं. ६.३० वाजता लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर दिवाळी संध्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गायक उत्तरा केळकर, कविता राम, अभिषेक नलावडे, केतकी भावे, श्रीरंग भावे यांचे गीत सादरीकरण झाले. अमित काकडे यांचे निवेदन तर दिगंबर नाईक यांचा विशेष सहभाग यात होता.

आ. मनीषा चौधरी यांच्या पुढाकारातल्या नमो उत्सवात आज, शनिवारी (ता.११) रोजी सायं. ६.३० वा. विद्या मंदीर शाळेचे सभागृह, छ. शिवाजी महाराज रोड, आनंद नगरच्या बाजूला, दहिसर येथे कार्यक्रम होणार आहे. गायक कलाकार दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, राधिका नांदे, अभिषेक नलावडे, स्मिता गवाणकर यांचे गीत सादरीकरण यावेळी होईल. संगीत संयोजन अमित गोठीवरेकर, दिपक कुमठेकर यांचे असणार आहे.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वात सोमवारी (ता. १३) रोजी पहाटे ६ वाजता. साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नी रोड येथे दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अभिनेता संकर्षण कराडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा खुमासदार शैलीतील विनोदी कार्यक्रम होणार आहे. तसेच गोरेगाव पूर्व येथे नागरी निवारा परिषद झोन १/२ सर्कलजवळ दिवाळी पहाट कार्यक्रम होईल. तेथे गायक कलाकार दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे यांचे सादरीकरण तर कुणाल रेगे यांचे निवेदन असणार आहे.

विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर नं. २ येथील विकास हायस्कूल सभागृहात सायं. ६.३० वाजता दिवाळी संध्या कार्यक्रम होणार आहे. गायक कलाकार दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, राधिका नांदे, अभिषेक नलावडे, स्मिता गवाणकर यांचे गीत सादरीकरण तर दिगंबर नाईक यांचा यात  विशेष सहभाग असणार आहे.

मुंबई भाजपाचे सचिव जितेंद्र राऊत, भाजपा माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.१४) पहाटे ६ वाजता राजा बढे चौक, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. तेथे गायक दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, संजीव चिम्मलगी, स्वरा जोशी यांचे गीत सादरीकरण, कुणाल रेगे यांचे निवेदन तर संगीत संयोजन अमित गोठीवरेकर, दिपक कुमठेकर यांचे असणार आहे.

जीवनगाणीचे प्रसाद महाडकर यांच्यातर्फे सर्व कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईकरांसाठी विनामूल्य आहेत. भाजपाच्या त्या-त्या विभागात त्यांच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दिवाळीनिमित्त आयोजित या खास कार्यक्रमांना मुंबईतील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content