मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारीला संघर्ष सदन हॉल, म्हाडा संकुलाजवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम), मुंबई-४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.
भरतीइच्छुक नियोक्ते यांनी जास्तीतजास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर “Pandit Dindayal Upadhyay Job Fair” ऑप्शनवर क्लिक करुन “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्त पदे अधिसूचित करावी व २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहवे. याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
या मेळाव्याचा जास्तीतजास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहरचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.