स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात झाली आहे. स्वीडनमधील गणेश मंदिरातील आमच्या पहिल्याच परफॉर्मन्सला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आहेत आणि गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले. त्यांनी एकत्रितपणे ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले आहे. त्याद्वारे हा परफॉर्मन्स करण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त आमच्या पथकाने सलग 2 तास धमाकेदार परफॉर्मन्स केला. भाविकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत, बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या आमच्या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर आपल्या भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव दिला.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230929-WA0003-1024x571.jpg)
आमच्या पथकाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. सातासमुद्रापार आम्ही आमच्या सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत, असे प्रणाली मानकर यांनी सांगितले.